आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule News In Marathi, Bogus Doctor, Divya Marathi

जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर सापडत का नाही ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्ह्यात बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतरही बोगस डॉक्टर का सापडत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी केली.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.सुशील वाक्चौरे, आयएमएचे मुख्य समन्वयक डॉ. रवी वानखेडकर, डॉ. बोर्डे, पोलिस उपअधीक्षक एम. बी. पाटील, पोलिस निरीक्षक के. बी. जाधव, सामाजिक कार्यकर्त्या तस्नीम जलगाववाला, अँड.चंद्रकांत येशीराव उपस्थित होते. विवेक गायकवाड म्हणाले की, बोगस डॉक्टरांविषयी निनावी तक्रारी असून त्यांची दखल आरोग्य विभागाने घ्यावी. बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. कारवाईसाठी समितीने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. समितीचे सदस्य अँड. चंद्रकांत येशीराव म्हणाले की, बोगस डॉक्टरांच्या प्रकरणाकडे समितीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.


बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सूचना केली होती ; परंतु त्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली नाही. जे अधिकारी बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल. डॉ. अरविंद मोरे, जिल्हा आरोग्याधिकारी, धुळे