आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोठणबिंदू ‘गार’साठी कारणीभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सर्वसाधारणपणे जमिनीच्या तापमानात वाढ होऊन समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवनाद्वारे ढग तयार होऊन पाऊस पडतो ; परंतु मान्सून वगळता इतर काळात येणार्‍या पावसाला वातावरणातील बदल कारणीभूत असतो. अशा प्रकारच्या वातावरणातील बदलामुळे सध्या राज्यभरात गारांचा पाऊस पडत आहे. ढगाचे पाणी जमिनीवर येण्यापूर्वी हवेतील तापमान गोठणबिंदूपर्यंत गेल्यास पाण्याची गार तयार होत असल्याची माहिती कृषी विभागातील हवामान विभागातील तज्ज्ञांनी दिली.


वातावरणातील बदलाचे नेमके कारण काय असून शकते याबद्दल कृषी महाविद्यालयातील हवामान विभागातील प्राध्यापकांकडून मत जाणून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार नेहमीच्या प्रक्रियेद्वारे मान्सूनमध्ये होणार्‍या पावसापेक्षा इतर वेळी पडणार्‍या पावसाचे कारण वेगळे असू शकते. मान्सूनमध्ये गारांचा पाऊस सहसा होत नाही. कारण तेव्हा हवेतील तापमान हे गोठणबिंदूपर्यंत पोहोचत नाही. सुमारे दोन हजार मीटर अंतरावर तयार होणार्‍या ढगातील पाणी जमिनीवर पावसाच्या रूपात पडते ; परंतु मोसमाशिवाय हिवाळा अथवा पूर्वमान्सूनचा जेव्हा पाऊस होतो. तेव्हा मात्र, हवेतील तापमान गोठणबिंदूपर्यंत गेल्यास पाण्याची गार तयार होते.

तापमान गोठणबिंदूपर्यंत पोहोचते. त्यात ढग आल्यास गारांचा पाऊस पडू शकतो किंवा ढगातील पाणी जमिनीवर येताना गोठणबिंदू इतके तापमान झाल्यास ढगातील पाण्याचे बर्फाच्या कणात रूपांतर होऊन ते गारांच्या स्वरूपात जमिनीवर पडते. ते अभ्यासातून सांगणे शक्य होऊ शकते. प्रा. पी. एम. चौधरी, हवामानशास्त्रतज्ज्ञ