आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule News In Marathi, New Voters, Election, Divya Marathi

नवमतदारांच्या कौलावर भवितव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नेहमीच मतदारांची कसोटी पाहणार्‍या निवडणुका मतदारांसाठी आव्हानात्मकच ठरतात. कोण डावा आणि कोण उजवा हे ठरविण्याची वेळ येते तेव्हा परंपरागत मतदार साशंक असतो. या स्थितीत नवमतदारांचा कौल महत्त्वाचा ठरतो. त्यांच्यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरते. धुळे लोकसभा मतदारसंघात जवळपास पाऊण लाख मतदार यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. त्यांच्या मताला यामुळेच महत्त्व राहणार आहे.


मतदारसंघ दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला
धुळे लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. त्याचा फटका उमेदवारांना प्रचार करताना बसतो. उमेदवारांची पुरती दमछाक करणार्‍या या मतदारसंघात यंदा जवळपास पाऊण लाख मते वाढली आहेत. गतवेळी संपूर्ण मतदारसंघात 15 लाख 79 हजार 117 मतदार होते. यंदा त्यात वाढ झाली असून, मतदारांची ही संख्या 16 लाख 43 हजार 720 इतकी झाली आहे. 64 हजार 603 मतदार वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मतदार याद्या अद्ययावत केल्यानंतरही काही मतदारांनी नोंदणी केली आहे. परिणामी मतदारांची ही आकडेवारी पाऊण लाखापर्यंत गेली आहे. हे सगळे नवमतदार आहेत. ते यंदाच्या लोकसभेसाठी प्रथमच मतदान करतील. पाच वर्षांत वाढलेल्या या मतदारांमध्ये तुलनात्मरीत्या आकडेवारी पाहिली तर महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत वाढ झालेली दिसते. तब्बल 33 हजार 97 इतके पुरुष मतदार वाढले आहेत. गतवेळी आठ लाख 13 हजार 500 पुरुष मतदार होते. यंदा वाढ होऊन ही संख्या आठ लाख 62 हजार 365 वर पोहोचली आहे. तर महिला मतदारांची आकडेवारी सात लाख 65 हजार 617 इतकी होती. यंदा त्यात 15 हजार 768 ने वाढून ही संख्या सात लाख 81 हजार 365 वर जाऊन पोहोचली आहे. महिला मतदारांच्या नोंदणीत निरुत्साह होता, हे यावरून दिसून येते.


शिंदखेडा मतदारसंघात सर्वाधिक वाढ
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जवळपास 25 हजार 248 मतदारांची नोंद झाली. त्या खालोखाल धुळे शहरमध्ये 16 हजार 173 तर धुळे ग्रामीणमध्ये 13 हजार 142 तर मालेगाव शहरमध्ये 6 हजार 72 तसेच बागलाण भागात 5 हजार 326 मतदारांची नोंद झाली आहे.


मालेगाव ग्रामीणमध्ये मतदारांची संख्या 1348ने घटली
मतदारांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत राहणे यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. मात्र, मालेगाव ग्रामीणमध्ये याउलट घडले आहे. या भागात चक्कमतदारांची संख्या एक हजार 348 इतकी घटली आहे. सन 2009 मध्ये 2 लाख 83 हजार 757 इतक्या मतदारांची नोंद झाली होती. यंदा मात्र 2 लाख 82 हजार 409 इतकी संख्या नोंदविण्यात आली आहे.