आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- पारोळा रोडवरील कोयल पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; 1 जण ठार, दोघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी झालेला पेट्रोल पंपावरील कर्मचारी... - Divya Marathi
जखमी झालेला पेट्रोल पंपावरील कर्मचारी...
धुळे - येथील पारोळा रोडवर असलेल्या कोयल पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी पंपावर झोपलेल्या पोकलॅन्ड ड्रायव्हरची निर्घृण हत्या केली. तसेच त्यांना अडवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा वार केले. यात पंपावरील 2 कर्मचारी जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी यात हजारोंचा रोकड लंपास केला.
 
 
दरम्यान, ASP विवेक पानसरे, DYSP हिम्मत जाधव, निलेश सोनवने आणि लोकल क्राईम ब्रांचचे PI रमेशसिंग परदेशी व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पसार झालेल्या दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.  फागणे गावाजवळ असलेल्या कोयल पंपावरील पहाटे 3 ते 4 दरम्यान ही घटना घडली आहे. हा प्रकार झाला त्यावेळी पंपावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती. त्यामुळे, पेट्रोल पंप चालक सुरक्षेबाबत जागृक नाहीत अशी टीका सुद्धा होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...