आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Ration Grain Black Marketing Gujrat Connection

रेशन धान्याचे गुजरात कनेक्शन, बनावट पावती औरंगाबादची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - रेशन दुकानातील धान्याचा गुजरातपर्यंत होणारा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. गस्तीवर असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी हा तांदूळसाठा जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात औरंगाबाद, सुरत येथील व्यापार्‍यांचाही समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी हे सोमवारी (दि.2) मध्यरात्री गस्तीवर होते. या वेळी धुळेमार्गे सुरतला जाणारा ट्रक (डब्ल्यू.बी.39/ए.5199) त्यांना दिसला. त्यानंतर त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना कळविले. या ट्रकमधून रेशनच्या तांदळाची काळयाबाजारात विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत होती. त्यानंतर पोलिसांनी हा ट्रक गरताड शिवारातील संगीता हॉटेल जवळ अडविला. वाहनचालक जुमा गुल मोहंमद नयानी (36), सहचालक आरिफ उस्मान सिद्दी (28, दोघे रा. जामनगर, गुजरात) यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर केलेल्या पोलिस तपासणीत या वाहनामध्ये तांदळाच्या सुमारे 400 गोण्या मिळून आल्या. हा तांदूळसाठा औरंगाबाद येथील टीव्ही टॉवरजवळ राहाणारा मुकेश जैन उर्फ गंगवाल आणि राजू नामक तरुण तसेच अन्य एकाने काळयाबाजारात विक्रीसाठी या ट्रकमध्ये भरला होता. सुरतमधील बाबूलाल भोलाराम या व्यापार्‍यापर्यंत तो पोहोचविला जाणार होता, अशी माहिती पुढे आली. दरम्यान या दोघांकडे पोलिसांना बनावट पावत्याही मिळून आल्या. या कारवाईत चार लाख पाच हजारांचा तांदूळ व ट्रकसह 11 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युनूस शेख यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध भादंवि कलम 120 ब,420,468,471,34 तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी व हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक भालचंद्र अहिरराव, सु. का. पाटोळे, मुकुंद पाटील, मच्छिंद्र पाटील, नरेंद्र कुलकर्णी, प्रभाकर बैसाणे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुढील स्लाइडमध्ये, बनावट पावती औरंगाबादची...