आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Riots Inqury By Judicially ;declear Chief Minister

धुळे दंगलीची न्यायालयीन चौकशीची मुख्‍यमंत्र्यांकडून घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल लवकरात लवकर मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दंगलीत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख, कायम अपंगत्व आलेल्यांना तीन लाख, जखमींना वैद्यकीय खर्च आणि ज्यांची घरे, वाहने व मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा सर्व दंगलग्रस्तांना आॅगस्ट 2004च्या निर्णयात सुधारणा करून चौपट मदत दिली जाईल. हा निर्णय यापुढे राज्यभरासाठी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

सहा जानेवारी रोजी शहरात उसळलेल्या दंगलीत पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. तर पुढील तीन- चार दिवसात मृतांचा आकडा सहापर्यंत गेला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील मंगळवारी शहरात आले होते. शहरातील विविध पक्ष, संघटना आणि शिष्टमंडळांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी घटनेमागील कारणमीमांसा जाणून घेतली. तसेच अधिका-या ची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पत्रकारांशीही संवाद साधला.

उपाय सूचविण्याची समितीला अट
धुळे दंगलीमागची सत्यता निवृत्त न्यायाधीशांमार्फत तपासली जाणारच आहे; पण शहरात वारंवार होणा-या दंगलीच्या घटना टाळणे आणि दोन धर्मियांमध्ये सलोखा व शांतता निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत उपाययोजना सुचविण्याची अटही चौकशी दरम्यान टाकली जाणार आहे. न्यायालयीन चौकशीत दंगली टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना सुचविल्या जातील, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बेकारी, गरिबीही दंगलीचे कारण : आर.आर. पाटील
धुळ्यात वारंवार दंगलीच्या घटना होणे ही गंभीर बाब आहे. त्यामागे अनेक कारणे असली तरी बेकारी आणि गरिबी हेही एक कारण आहे. आपलं काहीच नुकसान होणार नाही, अशी भावना मनात ठेवून काही दंगलीत उतरतात. त्यामुळे शासन रोजगार निर्मितीबाबत विचाराधीन आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. दंगल रोखण्यात पोलिस कमी पडल्याचे कुठेही दिसले नाही.

पोलिसांची भूमिका ही नि:पक्ष असली पाहिजे. धुळे दंगलीत एक पोलिस कर्मचारी स्वत: वाहनांची मोडतोड करीत होता, अशी क्लिप आम्हाला दाखवण्यात आली. अशा बेजबाबदार कर्मचा-या ला निलंबित करण्याचे आदेश मी आजच दिले आहेत; पण चांगली कामगिरी करणा-या पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही, याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे. धुळ्यात गोळीबाराची गरज होती का? या सर्व मुद्द्यांची चौकशी होणारच आहे, असे पाटील म्हणाले.