आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात स्टेट बॅँकेची 14 लाखांत फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील स्टेट बॅँकेत बनावट धनादेश टाकून सुमारे 14 लाख रुपयांची रोकड काढून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बॅँकेच्या मुंबईतील कर्मचार्‍याने वरळी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी रात्री धुळे पोलिसात गुन्हा वर्ग करण्यात आला.

यासंदर्भात ज्योतिप्रकाश कृष्णरामन (52, रा. मालाड, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्टेट बॅँक ऑफ इंडियामध्ये इलेक्ट्रोमेट कंपनीचे खाते आहे. परीक्षित पांडे नामक व्यक्तीने धुळ्यातील ईशकृपा बिल्डिंगमध्ये असलेल्या बॅँकेच्या खात्यात बनावट धनादेश (क्र.571697 ते 99) टाकून त्यावर खोटी सही केली. त्याद्वारे संबंधित कंपनीच्या खात्यातून 14 लाख 38 हजार 901 रुपये काढून घेण्यात आले. दि. 22 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅँकेच्या वतीने ज्योतिप्रकाश कृष्णरामन यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. यातून इलेक्ट्रोमेट कंपनी व बॅँकेची फसवणूक करण्यात आली. त्यानुसार परीक्षित पांडेविरुद्ध भादंवि कलम 465, 467, 468, 471, 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शनिवारी रात्री धुळे शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुहास राऊत या घटनेचा तपास करीत आहेत.