आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तहसीलदाराच्या लीलांचा स्टिंग ऑपरेशनने पर्दाफाश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - एका विधवा महिलेचे प्रकरण मंजूर करण्यासाठी तहसीलदार ईश्वर राणे याने तिच्या नातीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. हा प्रकार कळताच शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक हेमलता हेमाडे यांनी स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले. संबंधित तरुणी तयार असल्याचे सांगून 13 जून रोजी राणेला आविष्कार कॉलनीतील एका घरी बोलावण्यात आले. तेथे आधीच छुपा कॅमेरा बसवला होता. राणेने अतिप्रसंग करू नये म्हणून सुरक्षिततेसाठी दाराच्या आड एका तरुणाला उभे करण्यात आले होते. घरात आल्यावर राणेने प्रस्ताव मंजुरीवर सही करण्यासाठी रोख रक्कम घेतली. ती मोजून स्वत:कडे ठेवून घेतल्यानंतर त्याने तरुणीला जवळ ओढून घेत तिच्याशी चाळे सुरू केले. मोबाइलमधील अश्लील फिल्मही दाखवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दाराआड लपलेला तरुण बाहेर आला. त्यामुळे राणे पळून गेला होता. तो गुरुवारी हाती लागला.

:छायाचित्र - पैसे घेऊनही गरजू तरुणीशी केले अश्लील चाळे.