आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: ट्रकला अपघात, महामार्गावर विखुरली नाणीच नाणी, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पैशांचा पाऊस अापण फक्‍त कथांमध्‍येच ऐकताे. पण धुळ्यातील नरडाणा गावाजवळ महामार्गावर विखुरलेली नाणे पाहून वाहनचालकांना काहीसा नाण्‍यांचा पाऊस पडल्‍याचाच अनुभव आला. घडले असे की, एक रुपयांची नाणी बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरिअल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा नरडाणा गावाजवळ अपघात झाला. या ट्रकमध्‍ये 31 बॅरल होते. त्‍यापैकी 20 बॅरल खाली पडल्‍याने महामार्गावर नाणीच नाणीच पाहायला मिळाली. या मार्गावरून येणारे जाणारे प्रवासी काही वेळ येथे थांबून नाण्‍यांची सावरासावर पाहत होते.
पोलिस तत्‍काळ घटनास्‍थळी
हा ट्रक बंगळुरूहून नोएडाच्या दिशेने जात होता. मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणा गावाजवळ ट्रकला अपघात झाला. या प्रकारानंतर नरडाणा पोलिसांनी त्‍वरीत घटनास्थळी धाव घेतली व महामार्गावर सांडलेली नाणी गोळा करुन सुरक्षित ठेवण्यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, रस्‍त्‍यावर विखुरली नाणीच नाणी..