आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- दुचाकीवर दांपत्याचा 29 राज्यांत 20 हजार किलाेमीटरचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- केवळ दुचाकीसारखे वाहन अन् अनाेळखी ठरणाऱ्या २९ राज्यांमधील प्रवासाचा धाेका पत्करत पुण्यातील डाॅक्टर दांपत्याने तब्बल २० हजार किलाेमीटरचे अंतर कापले. यात बेटी बचाव अन् पाणी बचावचा संदेश दिला. या दाेन समस्या देशभरात माेठ्या प्रमाणात वाढल्या अाहेत, असे मत डॉ. विजय चौधरी त्यांच्या पत्नी वैशाली चौधरी यांनी व्यक्त केले. पुण्यापासून त्यांनी मोटारसायकलीवर भ्रमण करायला प्रारंभ केला. २० हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते शनिवारी शहरात पाेहचले. महापालिकेत त्यांचे स्वागत करण्यात आले. 
 
दुचाकीवर २९ राज्यात प्रवास केल्यानंतर डाॅ. विजय चौधरी यांनी त्यांचे अनुभव उद्देश सांगितला. ते म्हणाले की, मुलींचे कमी होणारे प्रमाण पाहता ‘बेटी बचाव बेटी पढाव’ बाबत जागृतीची गरज आहे. पाणी वाचविण्याचाही संदेशही सध्या देत अाहाेत. दि. फेब्रुवारीला पुणे येथून देशभ्रमणाला सुरुवात केली. 
 
आतापर्यंत २० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यादरम्यान २९ राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशातून प्रवास केला. माणुसकीचा प्रत्यय सर्वच ठिकाणी आला. विविध भाषा, संस्कृती, चालीरिती खानपान पद्धती वेगळ्या असल्या तरी देश एका सूत्राने बांधलेला अाहे. भ्रमंती दरम्यान दररोज २०० ते ३०० किलोमीटरचा प्रवास हाेताे. भाषेची फारशी अडचण जाणवली नाही. सर्वत्र हिंदी भाषा समजते. यात केवळ केरळात भाषेची अडचण अाली. उर्वरित.पानत्याप्रमाणेपूर्वेकडील राज्यातही चांगला अनुभव आला. मात्र तेथील रस्ते खडतर असल्याने शंभर किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १३ तास लागले. इम्फाळच्या अलीकडे ९० किलोमीटर अंतरावर पोहाेचल्यावर अंधार झाला होता. तो भाग नक्षलग्रस्त आहे. तेथे पोलिसांची भेट घेऊन राहण्याची व्यवस्था विचारल्यावर त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांकडे रात्रीची सोय केली. मात्र, त्या भागात मांसाहाराचे प्रमाण असल्याने त्यांनी रात्री एका राजस्थानी किराणा दुकानदाराकडून साहित्य आणून भाेजन दिले. विविध राज्यातून जाताना तेथील शाळा, महाविद्यालय, कार्यालय, गावात नागरिकांना बेटी बचाव जल बचावचा संदेश दिला. बेटी बचावसाठी हुंडा पद्धत बंद होण्याची जागृती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. विजय चौधरी वैशाली चौधरी यांचा सत्कार स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, उपमहापौर उमेर अन्सारी, सभागृह नेता अरशद शेख, विरोधी पक्षनेता गंगाधर माळी, नगरसेवक संजय गुजराथी, मनोज वाघ यांनी केला. 
 
देशातील बहुतेक नद्या कोरड्याच 
देशात जलसंकट आहे. पाणी किमती असून, त्याची नासाडी थांबवली पाहिजे. जमिनीतील पाण्याचा माेठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान गंगा, ब्रम्हपुत्रा महानंदा सारख्या नद्या सोडल्यास जवळपास सर्वच नद्या कोरड्या दिसून आल्या. 
 
पाऊस,बर्फ उन्हाचा अनुभव 
मोटारसायकलवरप्रवास करताना मेघालयात पोहाेचल्यावर पाच दिवस सतत पाऊस होता. त्यानंतर हिमाचल, सिक्कीम येथे बर्फ जैसलमेरपासून रणरणत्या उन्हाचा अनुभव प्रवासादरम्यान घेतले.  
 
देशी दारूच्या दुकानावर मिळाले गरम पाणी 
राजस्थानातजैसलमेर ते बाडमेरदरम्यान कोणत्याही ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या रस्त्यादरम्यान केवळ एक देशी दारूचे दुकान दिसले. त्या ठिकाणी पाण्याची मागणी केल्यावर गरम पाणी पिण्यासाठी मिळाले, असा अनुभवही त्यांनी सांगितला. 
 
बातम्या आणखी आहेत...