आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळेकर अमाेघचा अरबी समुद्रात पाेहण्याचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अरबीसमुद्रात १७ किलाेमीटर अंतर पोहून पार करत येथील अमाेघ कुरकुरे याने नवीन विक्रम केला. माेराजेट्टी ते कासा हे अंतर पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला अाहे. त्याने हे अंतर ब्रेस्ट स्ट्राेकचा वापर करून तास मिनिटांत पूर्ण केले.

येथील अमोघ कुरकुरे याला लहानपणापासून पोहण्याची आवड होती. तो मागील अाठ वर्षांपासून मुंबईतील अमेय क्लासिक क्लबचा जलतरण तलाव विरार येथील यशवंतनगरातील कृत्रिम तलावात पोहण्याचा सराव करत आहे. त्याने सुंक राॅट (लाइट हाऊस) टू गेट वे अाॅफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर दाेन वेळा, मालवणमधील शिवला बीचपर्यंतचे पाच किलोमीटरचे अंतर दाेन वेळा रत्नागिरीच्या भाटे बीचपर्यंतचे तीन किलोमीटरचे अंतर पोहून पार केले आहे. त्याचबरोबर त्याने अनेक अांतरशालेय राज्यस्तरीय स्पर्धांत यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अरबी समुद्रात पोहण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार माेराजेट्टी ते कासा हे अंतर त्याने ब्रेस्ट स्ट्राेकचा वापर करून तास मिनिटांत पूर्ण केले. या वेळी माेराजेट्टी सागरी पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार अहिरे यांनी अमाेघला शुभेच्छा दिल्या. समुद्रात पोहताना अमोघला जाेरदार वारा उंच लाटांचा सामना करावा लागला. मात्र, त्याने हार मानता हे अंतर पूर्ण केले.

अाता त्याने येत्या ऑक्टोबरमध्ये रेवस ते धरमतर हे १८ किलोमीटरचे अंतर पार करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय तो विदेशातील काही स्पर्धांतही सहभागी होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. अमाेघची जलतरणाची आवड पाहून त्याला विरारचे प्रथम महापाैर राजीव पाटील यांनी अमेय क्लासिक क्लबच्या जलतरण तलावात जिममध्ये माेफत सराव करण्याची परवानगी दिली अाहे. अमोघला अांतरराष्ट्रीय जलतरणपटू संताेष पाटील, राजीव पाटील, पालघर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे पदाधिकारी निरीक्षक सुनील पाटील, स्पर्धा मार्गदर्शक संताेष पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.

अमाेघ मूळचा धुळेकर...
अमाेघ येथील साक्री रोड परिसरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.कै. ल. भा. कुरकुरे समाजवादी महिला सभेच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऊर्मिला कुरकुरे यांचा नातू अाहे. त्याची अाई सुरेखा विवेक कुरकुरे या मूळच्या धुळ्याच्या रहिवासी असून, विरार-वसई महापालिकेच्या नगरसेविका अाहेत. तसेच प्रा.नरेंद्र कुरकुरे प्रा.डाॅ.प्रिया कुरकुरे यांचा ताे पुतण्या अाहे. अमाेघ काही वर्षे धुळ्यात वास्तव्याला हाेता. त्याने यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

चाैथ्या वर्षापासून पाेहण्याचा छंद...
अमाेघला चार वर्षांचा असल्यापासून पाेहण्याची अावड अाहे. पाण्याविषयी त्याला नेहमीच अाकर्षण वाटते. पाेहण्यासाठी त्याने प्रशिक्षण किंवा काेचची मदत घेतलेली नाही. स्वत:च्या निरीक्षण जिद्दीच्या जाेरावर त्याने हे यश मिळवले अाहे. काही दिवसांपूर्वी त्याने अरबी समुद्रात पोहण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद आहे. -सुरेखा कुरकुरे, अमाेघचीअाई
बातम्या आणखी आहेत...