आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंग निदान‘स्टिंग’साठी खर्चाचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गर्भलिंग निदान करून काळापैसा लाटणार्‍या डॉक्टरांना आळा घालण्यासाठी यापूर्वी शहरात केलेल्या ‘स्टिंग’ ऑपरेशनसाठी झालेल्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहर सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जे.पांडे यांनी दिली.

गर्भलिंग निदान करण्यासाठी होणार्‍या खर्चाचे नियोजन नसल्याने शासनाच्या धोरणामुळे ‘स्टिंग’चे बारा वाजल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने बुधवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मनपा वैद्यकीय अधिकार्‍यांनी आतापर्यंत झालेल्या खर्चाचा प्रस्ताव महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोनोग्राफी सेंटरच्या नोंदणीसाठी आता प्रत्येक सेंटरचालकाला 25 हजार रुपये फी अदा करावी लागते. यासाठी 2012-13 या वर्षात 2 लाख 40 हजार जमा झाले आहेत. त्यातून खर्चासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. खर्च किती करावा यासंदर्भात शहर सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. परंतु 2011 पूर्वी झालेल्या खर्चाची रक्कम देण्यासंदर्भात मार्गदर्शन मागवले जाणार आहे.

आम्ही प्रस्ताव देणार
महापालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत आम्ही खर्चाच्या रकमेसाठी आठवण करून दिली होती; मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहात नव्हते, परंतु आता खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार लवकरच प्रस्ताव देऊ. परंतु नवीन स्टिंगसाठी कराव्या लागणार्‍या खर्चाची तरतूद करणे गरजेचे आहे. वासंती दिघे सदस्य, पीसीपीएनडीटी समिती.