आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहू रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेडस्वस्तिक, मुंबई येथील नवनीत हायटेक हाॅस्पिटल जळगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात अाले अाहे. सर्व सुविधायुक्त सेंटरमध्ये दरराेज रुग्णांचे डायलिसिस करण्याची व्यवस्था करण्यात अाली असून गुरुवारपासून नाव नाेंदणी करण्यात येणार अाहे. यासाठी ‘ना नफा ना ताेटा’ तत्त्वावर ६०० रुपये शुल्क अाकारले जाणार अाहे, अशी माहिती अायएमएचे सचिव डाॅ. अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहा महिन्यांपूर्वी रेड स्वस्तिक नवनीत हायटेक हाॅस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा अायुक्तांची भेट घेऊन डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा मानस व्यक्त केला हाेता. त्यानंतर शाहू रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर पाच खाेल्या ताब्यात घेऊन अत्याधुनिक सेंटरची निर्मिती सुरू हाेती. किडनीचे विकार असलेल्या असंख्य रुग्णांना डायलिसिस करण्याची गरज भासत असते. हा अतिशय महागडा उपचार असल्याने अनेकांना उपचार घेणेही परवडत नाही. त्यामुळे ही समस्या लक्षात घेता ६०० रुपये अाकारून डायलिसिस करून देण्यात येणार असल्याचे डाॅ. धनंजय बेंद्रे अशाेक शिंदे यांनी सांगितले.

दानशूरांनी पुढे येण्याची गरज
सध्या तीन मशीनची व्यवस्था केली अाहे. खासगी रुग्णालयात डायलिसिससाठी पाच हजारांपेक्षा जास्त खर्च येत असताे. परंतु ‘ना नफा ना ताेटा’ तत्त्वावर उपचार केले जाणार अाहेत. गरजूंना हा खर्चही परवडणारा नसल्याने भविष्यात संपूर्ण खर्च माेफत करण्याचा विचार अाहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना विनंती करण्यात येणार अाहे.

फिश्युलाची शस्त्रक्रिया याेजनेतून
डायलिसिससाठी नेहमीच रक्त वाहिनीचा वापर करावा लागताे. त्यामुळे वारंवारच्या डायलिसिससाठी राज्य शासनाच्या अाराेग्यदायी याेजनेतून फिश्युलाची शस्त्रक्रिया करून देण्याची तयारी डाॅ. अनिल पाटील यांनी दाखवली अाहे. त्यामुळे वारंवार रुग्णांवर पडणारा अार्थिक भार कमी हाेणार असून हा निर्णय गरीब रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार अाहे.

रेडस्वस्तिकचे जाॅइंट एमडी अशाेक शिंदे, जळगाव शाखेचे अध्यक्ष डाॅ. धनंजय बेंद्रे, डाॅ. स्नेहल फेगडे, डाॅ. अनिल पाटील, डाॅ.गणेश राेटे, शशिकांत धांडे, यश शरद पांडे, संजय काळे, डाॅ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत डायलिसिस सेंटर सुरू करण्याची घाेषणा करण्यात अाली. गुरुवारपासून सेवा देण्यात येणार अाहे. तसेच अाचारसंिहता संपल्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण साेहळा अायाेजित करण्यात येणार अाहे. या सेंटरच्या माध्यमातून ना नफा ना ताेटा या तत्त्वावर दंत चिकित्सा उपचार, रंगीत साेनाेग्राफी मशीनही रुग्णांच्या सेवेत दाखल हाेणार असल्याची माहिती देण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...