आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diary Of Possible Research Ghadamoditunahi: Dr. Gadre

दैनंदिनाच्या घडामोडीतूनही संशोधन शक्य : डॉ. गद्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-दैनंदिन जीवनामध्ये घडणार्‍या गोष्टींकडे संशोधक वृत्तीने पाहिल्यास यातूनही समाजोपयोगी संशोधन निर्माण होऊ शकते. यातूनच नवीन संशोधक तयार होतील. संशोधनासाठी दृष्टिकोन, त्या का होतात, कशा होतात? या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास पूरक संशोधन करता येते, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व हाफकीन संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.व्ही.गद्रे यांनी व्यक्त केले.
मू.जे.महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘रॅब-2014 रिसर्च अव्हेन्यू अँड अँडव्हान्सेस इन बायोटेक्नॉलॉजी’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे डॉ. एस.एस.फालक अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य अनिल राव, डॉ. जी.एस.चौधरी, डॉ. आर.टी.महाजन, डॉ. मनोज चोपडा उपस्थित होते.
प्राचार्य अनिल राव यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले. डॉ. हरीश व्यास योग्य व्यवस्थापनाअभावी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष आणि त्यावरील उपाय यावर माहिती दिली. डॉ. सुधीर कुमार यांनी कॅन्सरवरील उती संशोधनाबद्दल माहिती दिली. दोन दिवसीय परिषदेत 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. अलका व्यास यांनी मार्गदर्शन केले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता पोस्टर प्रदर्शन होणार आहे, त्यानंतर परिषदेचा समारोप होणार आहे.