आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेमध्ये डिझेल घाेटाळा, मंजुरी घेताच हाेतेय खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेची अनेक वाहने बंद असतानाही डिझेलच्या वापरात कुठेही घट झालेली नाही. तसेच गेली काही वर्ष स्थायी अथवा महासभेची मान्यता घेताच परस्पर डिझेलची खरेदी केली जात अाहे. तर वाहनांची नादुरुस्ती आणि पंपात शिरणाऱ्या पाण्यात माेठा घाेटाळा असल्याचा अाराेप खाविअाने केला. या संपूर्ण प्रकरणाची मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चाैकशी करण्याचे जाहीर अायुक्तांनी केली.
महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात अाले. खाविअाचे नगरसेवक गणेश बुधाे साेनवणे यांनी डिझेल पंपाला गळती लागल्याचा विषय उपस्थित करून डिझेल खरेदी प्रकरणावर प्रकाश टाकला. पालिकेची वाहने नादुरुस्त झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना बाेलवण्यात अाले. यापूर्वी डिझेल पंपाची तपासणी का करण्यात अाली नाही? असा प्रश्न केला. वाहन विभागप्रमुख सुनील पी.भाेळे यांनी अाठ वाहने बंद पडल्यानंतर त्यात पाणी गेल्याचे निदर्शनास अाल्याचे सांगितले. पाणेवाडी येथील कंपनीला पत्र लिहून तातडीने कळवले, त्यानंतर साफसफाई केली. परंतु, एफअायअार पंप खराब असल्याचे निदर्शनास अाल्याची माहिती दिली. परंतु, डिझेल प्रकरणात काही तरी काळेगाेरे असल्याचा संशय व्यक्त करत साेनवणेे यांनी डिझेल खरेदी करताना अातापर्यंत एकदाही महासभा अथवा स्थायी समितीची परवानगी घेतलेली नाही. परस्पर धनादेश दिला जाताे. तसेच पालिकेची अनेक वाहने बंद पडली अाहेत, काही नादुरुस्त असतात तरीदेखील डिझेलच्या वापरात कुठेही घट नाही. त्यामुळे जनरेटरसाठी वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेलच्या व्यवहारात माेठा घाेटाळा असल्याचा अाराेप केला. अायुक्त साेनवणेंनी मुख्य लेखापरीक्षक निरंजन सैंदाणे यांच्यामार्फत चौकशी करण्याचे जाहीर केली.
पृथ्वीराज साेनवणेंनी नऊ महिन्यांत अतिक्रमणाच्या किती तक्रारी अाल्या, असा प्रश्न केला. तसेच अतिक्रमण विभाग तक्रारी साेडवत नसल्याचे साेनवणेंनी सांगताच मनसेचे अनंत जाेशी यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर समस्या असताना त्याबाबत काेणीही बाेलत नाही. मात्र, स्वत:चा स्वार्थ विशिष्ट हेतू ठेवून खासगी तक्रारी मांडल्या जातात. वास्तविक रहिवासी हे घरपट्टी भरतात, त्यांचा सर्वसामान्यांना काहीही त्रास नसताे. परंतु, स्वत:च्या फायद्यासाठी सार्वजनिक विषय बाजूला ठेवून खासगी विषयांना महत्त्व दिले जात असल्याचे जाेशींनी भाजप नगरसेवकांचे नाव घेता टाेला लगावला. यावरून साेनवणे जाेशी यांच्या शाब्दिक वाद झाला.
मनपाने १२ वाॅर्डांत दैनंदिन साफसफाईसाठी मक्तेदार नियुक्त केले अाहेत. महिन्याला लाख १० हजार दिले जाणार अाहेत, असे असतानाही दर रविवारी सफाईचे काम कसे काय बंद ठेवले जाते, मक्तेदारांना अातापर्यंत किती दंड केला, याची माहिती विचारत कामगारांना अाठवड्यातून एक दिवस सुटी देणे याचा अर्थ मक्तेदाराने संपूर्ण दिवसभरात साफसफाई करणे असा हाेत नाही, अशा शब्दात नगरसेवक श्यामकांत साेनवणे यांनी सुनावले. अाराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील यांनी काम बंद ठेवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे अाश्वासन दिले. एक दिवस काम बंद ठेवल्यास मनपाचे १२ हजार रुपयांचे नुकसान हाेते. महिन्याला एका मक्तेदारामुळे ४८ हजारांचे नुकसान हाेते. त्यामुळे साफसफाई बंद ठेवली जाणार नाही, असे अायुक्तांनी सांगितले.
पालिकेच्या मक्तेदारांकडून साफसफाईत खंड नकाे
बातम्या आणखी आहेत...