आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Differences Of Opinion In Nationalist Congress Party, Divya Marathi

संघटनात्मक फेरबदलावर राष्ट्रवादीत मतभिन्नता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभा, विधान परिषद आणि पक्षसंघटन या मुद्यावरून जिल्हा राष्ट्रवादीत होऊ घातलेल्या संघटनात्मक फेरबदलाच्या शक्यतेवरून पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या दौर्‍यात संघटनात्मक पातळीवर बदल करण्याची तयारी दश्रवली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र, सध्या कोणतेच बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईत यासंदर्भात खलबते सुरू असून राज्यभरातील प्रस्तावांवर खुद्द शरद पवार शनिवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांत संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेल्या पंधरवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत अजित पवारदेखील जिल्हा दौर्‍यावर आले होते. या वेळी संघटनात्मक पातळीवर बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांचा अहवालदेखील प्रदेश पातळीवर तयार करण्यात आला होता.
शरद पवारांच्या प्रतीक्षेत
संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या फेरबदलासंदर्भात प्रदेशाध्यक्षांकडे अनेकांनी मागणी केली आहे. अजित पवारांनीदेखील काही ठिकाणी बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. शनिवारी ते मुंबईत येणार आहेत. या वेळी त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बदलाचा फटका बसण्याची शक्यता
ऐन निवडणुका तोंडावर आल्याने पक्षात बदल करणे हिताचे नसल्याचा सूर काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांकडून आवळला जात आहे. जळगावचा विचार केल्यास गफ्फार मलिक यांना पदावरून दूर केल्यास ऐन निवडणुकीत अल्पसंख्याक मतदार राष्ट्रवादीपासून तुटण्याचा धोका आहे. त्यामुळे आहे ती कार्यकारिणी कायम ठेवावी असे मत काही पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे व्यक्त केले आहे.

फेरबदलावर चर्चा नाही
पक्षात संघटनात्मक फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. सध्या तरी जिल्हाध्यक्ष किंवा कोणतेही पद बदलाबाबत विचार नाही. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष,