आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आढळले दुर्मिळ शृंगी घुबड अन् 14 इंची वाळा जातीचा साप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार योगेश चौधरी यांनी कोल्हे हिल्स परिसरात दुर्मिळ शृंगी घुबडाचे (बुबो बैंगालेन्सेस) छायाचित्र कॅमेर्‍यात कैद केले आहे. डोळय़ाच्या अगदी वरच्या बाजूस 2 ते 3 इंच उंचीची कानसदृश उंच पिसे असतात व ती शिंगांप्रमाणे दिसतात म्हणून या घुबडास ‘शृंगी घुबड’ म्हटले जाते. आकाराने 50 ते 60 सेंटिमीटर असलेले हे घुबड निशाचर आहे. त्यामुळे शक्यतो ते दिवसा दिसत नाही. भारतातील सर्वच राज्यांत कमी प्रमाणात हे घुबड आढळून येते. डोंगरदर्‍या, जुन्या पडक्या इमारती व कडेकपार्‍यांमध्ये या घुबडाचा रहिवास असतो. छोट्या आकाराचे प्राणी, उंदीर, घुशी, सरडे, साप, पक्षी हे या पक्ष्याचे खाद्य आहे. या घुबडाचा प्रथम अधिवास पश्चिम बंगालमध्ये आढळून आल्याची नोंद झाल्यामुळे त्यास ‘बुबो बैंगालेन्सेस’ नाव पडले आहे.
विद्यार्थिनीच्या सतर्कतेने सापाला मिळाले जीवदान
शिवाजीनगरात सर्पमित्र रमाकांत सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी सूर्यवंशी हिने मूजे महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सोमवारी तिचा महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. दरम्यान, महाविद्यालयाच्या मैदानाशेजारील झाडाच्या मुळांजवळ वाळा जातीचा साप आढळून आल्याने इतर विद्यार्थ्यांनी त्यास मारण्याचा प्रय} केला; परंतु वैष्णवीने तत्काळ आपल्या वडिलांना फोन करून त्या सापाबद्दल माहिती घेतली आणि त्यास पकडून घरी नेले. वाळा जातीचे दोन ते सहा इंचांपर्यंतचे साप साधारणत: कोठेही आढळून येतात; मात्र वैष्णवीने पकडलेला वाळा जातीचा साप 14 इंच लांबीचा आहे. वाळा जातीचे साप जास्त मोठय़ा आकाराचे नसतात. आठ ते नऊ वष्रे वय असलेला हा साप आहे.
हे घुबड राज्यात सर्वत्र आढळत असले तरी सहजासहजी दृष्टीस पडत नाही. त्यामुळे त्यास दुर्मिळ म्हणता येईल. शहरालगत असलेल्या डोंगरदर्‍यांमध्ये या घुबडाचा रहिवास असतो. ते निशाचर असल्याने दिवसा दिसत नाही. डॉ.पी.एम व्यवहारे, पक्षितज्ज्ञ, धुळे