आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी वैतागले, रेल्वेस्थानकाला असुविधांचे ‘ग्रहण’, धावत्या गाडीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मॉडर्न रेल्वेस्थानकाकडे वाटचाल करणाऱ्या जळगावच्या रेल्वेस्थानकावर विविध असुविधा निर्माण झाल्या असून, ते जणू समस्याचेच माहेरघर बनू पाहत आहे. सध्या रेल्वेस्थानकावर पिण्यासाठी थंड पाणी, अस्वच्छता, पार्किंगची समस्या, बसण्यासाठी अपूर्ण खुर्ची अशा एक ना अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. जळगावला कुणी रेल्वेचा मोठा अधिकारी येत असला त्या वेळी काही तासांपुरता प्रवशांना सुविधा मिळतात आणि अधिकारी गेला तर सर्व परिस्थती ‘जैसे थे’ होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या समस्येवर वरच्यावर मलमपट्टी कराता कायमस्वरुपी उपाय करा, अशी मागणी आहे.

गेल्या महिनाभरात रेल्वेस्थानकावर तीन गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यात दोघा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात प्रवाशांची काहीप्रमाणात चूक असली तरी त्याला रेल्वे प्रशासनदेखील जबाबदार आहे. कारण दररोज शेकडो प्रवासी हे आपल्या जीवाची पर्वा करता धोकेदायक पद्धतीने प्रवास करत असतात.
उदाहरणार्थ धावती गाडी पकडणे, गाडीत जागा मिळवण्यासाठी दोन रुळांच्या मधोमध उभे राहून डब्यात चढणे, रूळ ओलांडणे, गाडीला लटकून प्रवास करणे, डब्याच्या पायऱ्यांवर बसून प्रवास करणे, विनाकारण प्रवाशांशी हुज्जत घालणे आदी उपदव्याप प्रवासी करतात. हे रोखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिस बलाच्या जवानांची आहे. पण ते त्याकडे कानाडोळा करीत असल्याने प्रवाशांची हिंमत वाढली आहे. अनेक वेळा जवानांची संख्या कमी असल्यामुळे त्यांनादेखील दोन्ही प्लॅटफॉर्मवर लक्ष देता येत नाही.
त्यामुळे रेल्वे प्रशासनानेदेखील त्यांच्या प्रवाशांच्या समस्या ओळखून त्या त्वरित सोडवण्याची गरज आहे. त्यामुळे प्रवाशा मोठा दिलासा मिळेल. तसेच रेल्वेस्थानकावर जवानांची गस्त वाढवणेही गरजेचे आहे. अन्यथा असुरक्षित प्रवास थांबवणे हे रेल्वे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असेल, यात शंका नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रवासी वैतागले...ऐन उन्हाळ्यात थंड पाणी मिळेना...
बातम्या आणखी आहेत...