आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळावेगळा विवाह : न्यूयॉर्कच्या डियानाने केले भारतीय पद्धतीने लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - न्यूयॉर्कमधील कोलंबिया येथे राहणारी डियाना रोजस ही बुधवारी जळगाव शहरातील श्रद्धा कॉलनीतील राजू जगन्नाथ नेवे याच्याशी विवाहबद्ध झाली. भारतीय संस्कृतीबद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी डियानाने वैदिक पद्धतीने लग्न केले. विवाह समारंभातील आंतरपाठ, घोडा, वरात, नवरीची वेशभूषा, मंगलाष्टक या सगळ्याच बाबींचे तिला अपु्रप वाटत होते. या सर्व पद्धती ती होणारा पती राजूकडून जाणून घेत होती. व-हाडी मंडळीदेखील प्रत्येक क्षण एन्जॉय करीत होते.

डियाना ही भारतीय रिती-रिवाज शिकण्यासाठी 1 ते 15 जानेवारी 2014 दरम्यान नेवे यांच्या घरी येऊन राहिली होती. या कालावधीत तिने लग्नाचे प्रकार बघितले. स्वयंपाक करायला शिकली. मराठीत बोलण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे आता ती थोडे मराठीही बोलून घेते. 15 दिवसांच्या नेवे परिवाराच्या सहवासानंतर तिने लग्नाला होकार दिला. लग्न भारतातच आणि भारतीय पद्धतीने करण्याचा तिचा मानस होता.
बुधवारी तो पूर्ण झाला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस येथे हा लग्न सोहळा पार पडला. डियानाच्या परिवारातून ती एकटीच या सोहळ्याला होती. यावेळी नेवे परिवारासह नातेवाइकांची उपस्थिती होती.

चार वर्षांपासून पसंती : श्रद्धा कॉलनीत राहणारे जगन्नाथ नेवे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यातील राजू हा सर्वात लहान मुलगा आहे. चार वर्षांपासून तो सॉफ्टवेअर डिझायनिंगचा जॉब करण्यासाठी कोलंबिया येथे राहतो तर डियाना ही देखील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेऊन सातासमुद्रापार असलेल्या दोन कुटुंबीयांना एकत्र आणले.
मुलीला मामाही जागेवरच उपलब्ध झाले : डियानाचे आई-वडील आणि बहीण या लग्नाला येणार होते. मात्र, व्हिसाची अडचण आल्यामुळे ते येऊ शकले नाही. डियाना एकटीच तिच्या लग्नाला आली होती. आंतरपाठ धरण्यासाठी राजूच्या बहिणीचे सासरे सुधाकर चिमणलाल दलाल हे पुढे आले. डियानाच्या मामाचे कर्तव्य त्यांनी पार पाडले तर व-हाडी मंडळीमधीलही काही जणांनी डियानाच्या मागे उभे राहून तिच्या कुटुंबीयांची अनुपस्थिती भरून काढली. आता लग्न आटोपल्यानंतर 10 जुलै रोजी नवदाम्पत्य पुन्हा कोलंबिया येथे जाणार आहे.
मंत्रोच्चरांचा अर्थही समजून घेतला भारतीय पद्धतीने लग्नाची तयारी, त्यानंतर नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येणे, ब्राह्मणाकडून मंगलाष्टक हे सारं डियानासाठी विशेष आकर्षण होते. मंगलाष्टक सुरू असताना चौरंगावर उभी असलेली डियाना प्रत्येक सेकंदाला होणारा राजूकडून समजून घेत होती. आरतीचे ताट, फुलमाळा, अक्षता हे सारं काही तिच्यासाठी नवीन होते. पण तिने ते आपलंसं मानून सर्व काही जाणून घेतले.