आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिघी लघुसिंचन प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा - दिघी येथील लघु प्रकल्पास मध्यभागी आठ ते दहा फुटाचा तडा गेल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ मध्ये 27 मे रोजी प्रसिद्ध झाले होते. वृत्ताची दखल घेऊन लघु पाटबंधारे विभागाने प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या दिघी नं.2 या 1989 मध्ये 240 हेक्टरवर एक कोटी 94 लाख रुपये खर्च करून प्रकल्पाचे काम करण्यात आले होते. दोन वर्षांपासून अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने व प्रकल्पात पाणी न साचल्याने प्रकल्पाच्या भिंतीतील काळी माती कोरडी होऊन धरणाच्या मध्यभागी 30 फूट लांबीचा व आठ ते दहा फूट रुंदीचा तडा गेला होता. दिघी व परिसरातील नागरिकांच्या मनात धरण फुटण्याविषयीची भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी निवेदन देऊन दुरुस्ती करण्यासंबंधीची मागणी केली. ‘दिव्य मराठी’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच लघुपाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता एस.डी.बागूल, शाखा अभियंता जे.ए.महाजन व काही तज्ज्ञांनी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. अधिकार्‍यांनी शाखा अभियंता व कर्मचार्‍यास तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. तडा गेलेल्या भागाच्या दोन्ही साइडची माती काढून चार ते सहा फुटापर्यंत खोदकाम करून त्या जागी टप्प्याटप्प्याने नवीन काळी माती व मुरुमांचे थर लावल्याचे काम पोकलॅण्ड मशीनने सुरू करण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता जे.ए.महाजन यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून दिघी मध्यम प्रकल्पाचे देखभाल दुरुस्तीचे काम झालेले नसल्याने धरणाच्या भिंतीवर मोठमोठे झाडे वाढलेली होती. भिंतीवरील झाडे काढण्याचे कामही जेसीबीने सुरू करण्यात आले आहे.

पावसापूर्वी काम पूर्ण करणार
दिघी सिंचन प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील गावांमधील भीतीचे वातावरण दूर झाले आहे. पावसास सुरुवात होण्यापूर्वी काम करण्यासाठी कर्मचारी अथक पर्शिम घेत आहेत. सुरुवातीला प्रकल्पाच्या कच्च्या रस्त्यावरील झाडे जेसीबीने काढण्याचे काम सुरू आहे. मातीचा भराव वाहून जी चारी तयार झाली होती. ती बुजण्यात येत असून प्रकल्प यामुळे सुरक्षित राहू शकेल.