आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्विजयसिंग यांची पत्नी, भावासह नर्मदा परिक्रमा यात्रा सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग नर्मदा परिक्रमा करत आहेत. ते कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दुर्गम भागात मुक्कामी आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील नर्मदेच्या उगमस्थानापासून परिक्रमेला सुरुवात केली असून, चांदसैली, राणीपूर मार्गे ते सोमवारी उनपदेव येथे आले. या ठिकाणी ते आदिवासींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. 

याविषयी दिग्विजयसिंग यांनी सांगितले की, आजोबांनी नर्मदा परिक्रमा केल्याने या परिक्रमेबद्दल अनेक वर्षांपासून कुतूहल होते. त्यामुळे माझीही नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. नर्मदा परिक्रमेला धार्मिक महत्त्व आहे. ही परिक्रमा करताना मला वेगळीच अनुभूती मिळत आहे. प्रत्येक भागात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दसऱ्यापासून परिक्रमा 
दिग्विजयसिंगयांनी दसऱ्यापासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील बरमान घाटापासून त्यांची ही यात्रा सुरू झाली आहे. सोमवारी ते उनपदेव येथे मुक्कामी होते. त्यांच्यासोबत पत्नी अमृता सिंग, भाऊ लक्ष्मण सिंग, माजी आमदार रामेश्वर मिश्रा, माजी आमदार नारायणसिंग तसेच ओ.पी. मिश्रा यांच्यासह कार्यकर्ते आहेत. परिक्रमेदरम्यान आदिवासींशी ते अास्थेवाईकपणे चौकशी करत करत आहेत. आदिवासींना रोजगार कसा उपलब्ध होतो? रोजगारासाठी कुठे स्थलांतरित हाेतात? उत्पन्न किती मिळते, यासारखी मािहती ते जाणून घेत आहेत. सात दिवसांनंतर ते गुजरात राज्यात जातील. नर्मदा काठावरील गावांना भेटी देऊन महिन्याच्या प्रवासानंतर ते पुन्हा मध्य प्रदेशकडे प्रस्थान करतील. त्यांची ही यात्रा सहा महिन्यांसाठी आहे. ही यात्रा राजकीय नसून, धार्मिक असल्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...