आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाचा खून, जीन परिसरात हा धक्कादायक प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- फटाके फोडण्याच्या शुल्लक कारणावरून तरुणाचा निर्घृण हत्या करण्‍यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील मनमाड जिन परिसरात घडली. दिनेश प्रल्हाद चौधरी (19) असे मृत तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी खून झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 

काय आहे हे प्रकरण?
- मनमाड जिन परिसरात काही जण फटाके फोडत होते. दिनेश आला आणि त्यांना फटाके फोडण्यास मनाई करू लागला. या क्षुल्लक कारणावर ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिल्लीत फटाकेबंदी केल्यानंतर, महाराष्ट्रातही सरकारने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, बहुतांश लोकांना कोणतीही फिकीर न बाळगता कानठाळ्या बसवणारे फटाके फोडले.
बातम्या आणखी आहेत...