आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipanagara Thermal Power Station Issue At Bhusawal

संच क्रमांक दोन झाला कार्यान्वित, वीजनिर्मिती वाढवण्याचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगर औ‍ष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक दोन रविवारपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. हॉपर दुर्घटनेनंतर संच पाचमधून प्रथमच ४७० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती झाली. सोमवारीतिन्ही संच कार्यान्वित असल्याने केंद्रातून ६८५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली.
दीपनगर केंद्रातील संच क्रमांक दोन बॉयलर ट्यूब लिकेज आिण अन्य तांत्रिक कारणांमुळे गेल्या पंधरवड्यापासून बंद होता. रविवारी हा संच लाइटअप करून कार्यान्वित करण्यात आला. यामुळे वीजनिर्मिती वाढण्यास मदत झाली. रविवारी संच क्रमांक पाचमधून ४७० मेगावॅट वीजनिर्मिती झाली. हॉपर दुर्घटनेनंतर या संचाने वीजनिर्मितीमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा टप्पा गाठला. सोमवारी संच क्रमांक दोनमधून १२०, संच तीनमधून १३५ तर संच पाचमधून ४३०, अशी एकूण ६८५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. राज्याला विजेची गरज असल्याने संच क्रमांक दोन तत्काळ पूर्ववत सुरू करण्यात आला.
संच चारची दुरुस्ती
दीपनगरकेंद्रातील संच क्रमांक चार १६ ऑगस्टपासून ३५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात संचाच्या बॉयलर, टर्बाइन, स्टीम आिण एअर व्हॉल्व आदी महत्त्वपूर्ण पार्टचे काम करण्यात येणार आहे. साधारण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन वीजनिर्मिती करेल.