आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर प्रकल्पाकडे पावणेतीन कोटी बाकी, पाणीपुरवठा बंदचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने पाटबंधारे विभागाचे तब्बल कोटी ७७ लाख रुपये थकवले आहेत. ही रक्कम तातडीने भरल्यास पूर्वसूचना देता कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. वीजनिर्मिती प्रकल्पाकडे पाटबंधारे विभागाची सन २०१४-२०१५ या वर्षाची बिगर सिंचन थकबाकीची कोटी ८५ लाख ९१ हजार २५१ रुपये थकबाकी होती. यापैकी डिसेंबरअखेर दीपनगर प्रशासनाने कोटी लाख १८ हजार ९०५ भरले. तथापि, त्यांच्याकडे अजूनही कोटी ७७ लाख ७२ हजार रुपये घेणे आहेत. ही रक्कम भरल्यास केव्हाही पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.
वापरानुसार आकारणी-
दीपनगरकडेअसलेल्या बिगर सिंचन थकबाकीची आकारणी, करारनाम्यातील कलम ११ (१) मधील अटी शर्तीनुसार आिण कोट्यानुसार प्रकल्पाने पाणी वापर कमी केल्याचे (९० टक्के) गृहित धरून करण्यात आलेली आहे. यानुसार डिसेंबर २०१४ पर्यंतचा आकडा कोटी ८५ लाख ९१ हजार २५१ रुपये एवढा होता.
भुसावळवर परिणाम
दीपनगरऔष्णिक वीज निर्मिती केंद्राने वेळेवर पैसे भरल्यास पाटबंधारे विभाग तापीतील आवर्तन थांबवू शकते. असे झाल्यास ऐन उन्हाळ्यात कोणतीही चूक नसताना भुसावळकरांच्या घशाला कोरड पडू शकते.