आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diploma Student Death At Jalgaon For Railway Accident

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा जळगावात रेल्वे अपघातात मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचा द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याचा बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हुतात्मा एक्स्प्रेसखाली आल्याने जळगाव रेल्वेस्थानकावर मृत्यू झाला.

सचिन नारायण जमदाडे (वय 17) असे त्याचे नाव असून, तो मूळचा पढेगाव (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथील रहिवासी आहे. त्याच्याजवळील कॉलेजची काळ्या रंगाची बॅग व ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. गावाकडे जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी वायरलेसवरून नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर दुपारी नातेवाईक जळगावकडे रवाना झाले. याबाबत रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कॉलेजमध्ये ‘टॉपर’ होता सचिन
डिप्लोमाला प्रवेश घेतलेल्या सचिनला पहिल्या सत्रात 85 टक्के, तर दुसर्‍या सत्रात 80 टक्के गुण मिळाले होते. अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचा असलेला सचिन कॉलेजमधील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अपघाती मृत्यूने महाविद्यालयात हळहळ व्यक्त होत आहे. सचिनच्या गावी त्याचे वडील, मोठा भाऊ असतात. मोठय़ा बहिणीचे नुकतेच लग्न झाले आहे.

वसतिगृहामधून नोंद न करताच निघाला
सचिन होस्टेलमध्ये रूम नंबर 126 मध्ये राहत होता. त्याचे रूम पार्टनर राहुल गायकवाड व अक्षय आढाव यांनी त्याला सकाळी 8 वाजता त्याला शांतपणे बसलेला पाहिले. त्यानंतर सचिनने समोरच्या खोलीतील मित्राला गावाला जात असल्याचे सांगितले. सोबत कॉलेजची बॅग घेऊन तो रेल्वे स्थानकावर गेला आणि सकाळी नऊच्या सुमारास त्याचा हुतात्मा एक्स्प्रेसखाली मृत्यू झाल्याची घटना घडली.

बी.एस्सी. करण्याची इच्छा
सचिनला डिप्लोमा करण्याची मुळीच इच्छा नव्हती. तो प्रथम वर्षात सर्वाधिक गुण मिळवल्यानंतरही बी.एस्सी. करण्याची इच्छा व्यक्त करत होता. मात्र, त्याची इच्छा पूर्ण न झाल्याने तो नेहमी उदास असायचा, असे त्याच्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना सांगितले.

कोणतीही नोंद नाही
हॉस्टेलमध्ये राहत असलेला सचिन हा गावी जात असल्याचे त्याने रेक्टर अथवा सिक्युरिटी गार्डकडे नोंद केली नाही. हॉस्टेलमध्ये राहणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला हिस्ट्रीकार्ड दिलेले असते. त्यात बाहेर जातांना रेक्टरची तसेच सिक्युरिटी गार्डची स्वाक्षरी असते. गावी जाणार्‍या विद्यार्थ्याकडून लेखी अर्ज घेतला जातो. डी.एस.बोंडे, प्राचार्य