आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सीएट’साठी पदवीधरांना थेट प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) ग्रॅजुएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सीएट कोर्स करण्यासाठी थेट प्रवेश देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांना सीएटमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा (एन्ट्री) देण्याची गरज नाही. त्यांना सीएसाठी सरळ प्रवेश घेता येणार आहे.
सीएला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी आणि पदवीनंतरही प्रोफिशिएन्सी चाचणी द्यावी लागत होती. मात्र, नव्या नियमानुसार ती केवळ बारावीनंतर प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच द्यावी लागणार आहे. नव्या प्रस्तावानुसार सीएच्या प्रवेशासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉर्मसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत 55 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या दोन्ही विभागांमध्ये अकाउंटिंग, ऑडिटिंग, कार्पोरेट लॉ, इकोनॉमिक्स, मॅनेजमेंट, फायनांशियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स लॉ, कॉस्टिंग, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आणि अकाउंटिंग या विषयांमधील तीन विषय असणे सक्तीचे आहे. या तिन्ही विषयांचे पेपर 100 गुणांचे असले पाहिजे. त्याचप्रमाणे कला आणि विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना 60 टक्के असले पाहिजे. विद्यार्थ्यांना ही संधी यंदाच्या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीपीटीसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुविधा देशात पाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पदवीधरांना होणार फायदा
नवीन नियमावलीचा पदवीधर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. जळगाव शहरात दरवर्षी बारावीनंतर 250 ते 300 विद्यार्थी सीएसाठी प्रवेशित होतात. बर्‍याचदा पदवीनंतर विद्यार्थ्यांची सीएट करण्याची मानसिकता तयार होते. पण त्या वेळी एंट्रन्समुळे विद्यार्थी प्रवेश घेण्याकरिता टाळाटाळ करतात; अशा विद्यार्थ्यांना नवीन नियमावलीचा फायदा होणार असून सीएसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. तेजस कावडिया, अध्यक्ष,आयसीएआय