आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Direction By Sean San Pune Pharmaceuticals Company

लठ्ठपणामुळे भावनिक आजारांत वाढ : डॉ.शाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लठ्ठपणामुळे मनात न्यूनगंड भीती निर्माण होत असल्याने लठ्ठ व्यक्तींमध्ये भावनिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया इंटरनॅशनल अॅक्सिलेन्स फेडरेशनचे डॉ.शशांक शाह यांनी केले.
लठ्ठपणा मधुमेहावरील चर्चासत्रात ते बोलत होते. पुणे सीन सॅन फार्मास्युटिकल कंपनीतर्फे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. लठ्ठपणाची कारणे उपाय याविषयी महत्त्वपूर्ण टिप्स देऊन त्यांनी स्थूल व्यक्तीवरील यशस्वी उपचारांची माहितीही दिली. व्यासपीठावर आयएमएचे सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे उपस्थित होते. संदीप महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
स्थूलतेने मधुमेह कॅन्सरची भीती
आधुनिककाळात श्रमाची कामे कमी होत असल्याने एकसारखे बसून लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. शरीरात मेद वाढल्याने लठ्ठपणा येतो. यासाठी केवळ व्यायाम आहारनियंत्रण करून लठ्ठपणावर नियंत्रण आणणे शक्य नाही, तर यासाठी जठर आतड्यांची जाडी कमी करणे आवश्यक ठरते. स्थूलतेमुळे मधुमेहासह यकृताचे आजार होऊ शकतात. यासाठी जठरावरील आयुष्य वाढवणारी शस्रक्रियाच गुणकारी ठरू शकते. या शस्त्रक्रियेनंतर आनंद वाढून तणाव भीती कमी होते, असेही डॉ. शाह म्हणाले.