आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुले मार्केटमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- फुले मार्केट मधील हॉकर्सकडून होणाऱ्या अतिक्रमणाबाबत तक्रारींचे प्रमाण वाढल्यानंतर पालिकेने शुक्रवारी सर्वेक्षण केले. यात १३२ पेट्या आढळून आल्या. शुक्रवारी रात्री पथकाने थांबून शेवटचा इशारा दिला असून शनिवार नंतर थेट गुन्हे दाखलची प्रक्रिया राबवण्यात येईल.
फुले मार्केटची आजची स्थिती अत्यंत वाईट झाली असून ग्राहकांना चालायलाही जागा मिळत नाही. याबाबत नेहमीच्या तक्रारींमुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सर्वेक्षण केले. यात १३२ लोखंडी पेट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. शुक्रवारी रात्री या पेट्या उचलून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रात्री वाजेच्या सुमारास पथकाने प्रत्यक्ष जाऊन अंतिम इशाराही दिला. शनिवारपासून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ओटा तोडला
शुक्रवारी दुपारी पथकाने फुले मार्केटमध्ये दुकानदारांनी केलेले अतिक्रमण तोडले. अभियंता जितेंद्र रंधे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. मुकादम संजय पवार, रवींद्र कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
क्लासेस चालकांविरुद्ध गुन्हे
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही अनधिकृत अपघाताला निमंत्रण देतील, असे फलक होर्डिंग लावले आहेत. कोर्ट चौकात तर निवडणुकीच्या प्रचारासाठी लावलेल्या फलकामुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. तसेच शहरात काही संगणकचालकांनी विनापरवानगी होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांविरुद्ध शनिवारी फौजदारी कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...