आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था, महापुरुषांच्या स्मारकांवर धुळीची चादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - थोर राष्ट्रपुरुष प्रेरणादायी व्यक्तींचे पुतळे समाजाच्या दआणिादर्शनासाठी सार्वजनिक ठिकाणी लावले जातात. त्यांची निगा राखण्याची जबाबदारी महापालिकेवर असताना शहरातील अनेक पुतळे मात्र धुळीने माखलेले आहेत. तसेच त्यांच्या अवतीभवती झाडेझुडपेही वाढलेली आहेत. त्यावर कहर म्हणजे, स्वत:च गेल्या तीन वर्षांपासून पुतळ्यांची स्वच्छता करणाऱ्या 'भारत बलवान' या सामाजिक संस्थेला पालिकेने 'हे तुमचे काम नाही, आम्ही बघू कसे करायचे ते' असे सांगून स्वच्छता बंद पाडली आहे.

या पुतळ्यांची करायचे स्वच्छता
दीपककवठाळकर यांनी हिंदू महासभेच्या कार्यक्रमावेळी शिवाजीनगरातील शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्वच्छतेपासून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर इतर सदस्य त्यांच्याशी जुळले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिवाजीनगरातील शिवाजी महाराज पुतळा, टॉवर चौकातील लालबहादूर शास्त्री, नेहरू चौकातील पंडित नेहरू, सवि्हिल हॉस्पिटलसमोरील डॉ.आंबेडकर पुतळा, अण्णा भाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर, मेहरूणमधील शिवाजी महाराज पुतळा, बहिणाबाई चौधरी, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले आदी पुतळ्यांची स्वच्छता होत होती. 'भारत बलवान'च्या सदस्यांच्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन अमळनेर भुसावळ येथील नागरिकांनी त्यांना उपक्रमाची माहिती देण्यासाठी तेथे बाेलावून मार्गदर्शन घेतले होते.

हे तुमचे काम नाही; ताबडतोब बंद करा
'भारतबलवान'च्या सदस्यांनी महापालिका आयुक्त, महापौर, पोलिस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना २० जुलै २०११ला पत्र देऊन पुतळे स्वच्छतेची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. त्या वेळी महापालिकेचे प्रभारी आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांनी 'भारत बलवान'च्या सदस्यांना बोलावून किती खर्च लागेल, हे तुमचे काम नाही, ते ताबडतोब बंद करा, पुतळ्यांची स्वच्छता कशी करायची ते आम्ही बघू, असे सांगून हे काम बंद पाडले.

स्वच्छता कायमची बंद
शहरातीलपुतळ्यांची स्वच्छता बंद पडल्याने पुतळ्यांवर धुळीचा थर साचला आहे. तसेच पुतळ्यांच्या परिसरात झाडेझुडपे उगवली आहेत. टॉवर चौकातील लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याजवळ पिंपळाची झाडे उगवली असून, पंडित नेहरूंच्या पुतळ्याभाेवती बाजरीचे पीक उगवले आहे. त्याचप्रमाणे मेहरूण तलावाजवळील शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभाेवती कीटकांनी जाळे विणले आहे.

तीन वर्षे सुरू होता उपक्रम
'भारतबलवान' संस्थेचे दीपक कवठाळकर, नारायण अग्रवाल, रमेश सपकाळे, शेख सादबि, आशिष जैस्वाल, अजय सोनवणे, कृष्णा कोळी, मुकेश शेवाळे सचिन तविारी हे नाेव्हेंबर २०१०पासून दर रवविारी शहरातील पुतळ्यांची स्वच्छता करत होते. 'भारत बलवान'चे हे सदस्य दर शनविारी एकत्र येऊन रवविारी कोणता पुतळा स्वच्छ करायचा हे ठरवत. तसेच रवविारी सकाळी वाजता त्या पुतळ्याजवळ जमून आजूबाजूचा परिसर झाडून तेथे उगवलेले गवत झाडेझुडुपे उपटून परिसर स्वच्छ करायचे. याशविाय जवळपासच्या ठिकाणावरून पाणी आणून पुतळा धुवायचे आणि माल्यार्पण करून 'वंदे मातरम्' म्हणून स्वच्छता मोहिमेचा समारोप करायचे.

पुढील स्लाईडवर पाहा, शहरातील इतर पुतळ्यांची दुरावस्था...