आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये होतोय पुन्हा अशुद्ध पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पालिकेच्या माध्यमातून होणार्‍या पाणीपुरवठय़ावर पुन्हा संक्रांत आली आहे. शनिवारी संपूर्ण शहरात दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आधीच ऐन पावसाळ्यात अपूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत असताना त्यात आता गाळमिर्शित पाण्याची भर पडली आहे.

पालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रातील क्युरोफाक्युरेटरमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात आला. यामुळे आलम प्रक्रिया नीटपणे होऊन शहराला शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जेमतेम महिना होत नाही तोच शनिवारी नळांना गाळमिर्शित पाणी आले. पावसाळ्यात आधीच जलजन्य आजारांचा धोका असतो. आता होणार्‍या दूषित पाणीपुरवठय़ामुळे ही भीती वाढली आहे. तापी आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरात गाळाचे प्रमाण जास्त असते. यामुळे हतनूर धरणातून सोडलेल्या आवर्तनातही गाळ अधिक असतो. रॉ वॉटर केंद्रातून उचललेले पाणी जलशुद्धिकरण केंद्रातून शुद्ध केले जाते. मात्र, सध्या गाळाचे प्रमाण वाढल्याने शुद्धिकरणाची क्रिया पूर्ण क्षमतेने होत नाही.