आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच वर्षांपासून नाही जलकुंभांची स्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील दूषित आणि गढूळ पाण्याच्या वितरणाची समस्या आता नवीन राहिलेली नसून त्यात आता जलकुंभांच्या अस्वच्छतेची भर पडली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहरातील दोन्ही जलकुंभांची स्वच्छताच झाली नसल्याचा गंभीर प्रकार ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.

पाणीपुरवठ्याच्या व्यस्त रोटेशनमुळे जलकुंभांची स्वच्छताच झाली नसून भविष्यातही स्वच्छतेचे नियोजन नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील 1 लाख 87 हजार लोकसंख्येला जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. शहरातील उत्तर भागात जलशुद्धीकरण केंद्रातील 14 लाख लिटर्स, तर दक्षिण भागातील नागरिकांना नाहाटा महाविद्यालयाजवळील 20 लाख लिटर्स क्षमतेच्या जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. तापीपात्रातून उचल केल्यानंतर शुद्धीकरण झालेल्या पाण्यातही गाळाचे प्रमाण अधिक असते. नळांद्वारे पाण्याबरोबर बारीक आकाराचे मासे आणि अळ्यादेखील येतात. यामुळे जलकुंभांची स्वच्छता गरजेची आहे.

गेल्या पाच ते साडेपाच वर्षांत एकदाही शहरातील दोन्ही जलकुंभांची स्वच्छताच झाली नसल्याची बाब पाहणीत समोर आली. शहरातील खडका रोडवरील जलकुंभ गेल्या तीन वर्षांपासून वापराअभावी बंदच आहे. रेल्वेच्या विभागातील जलकुंभावर स्वच्छता केल्याच्या तारखेसह पुढील स्वच्छता कधी होणार? याचा उल्लेख असतो. जलकुंभाच्या स्वच्छतेसाठी दोन महिन्यांतून एक दिवस पाणीपुरवठ्यात कपातही केली जाते. पालिकेला मात्र अशी उपाययोजना गरजेची वाटलेली नाही.
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभाची क्षमता 14 लाख लिटर्स आहे. दिवसभरातून मात्र या जलकुंभातून 1 कोटी 40 लाख लिटर्स पाणीपुरवठा होतो. यामुळे दिवसभरातून किमान 10 वेळा जलकुंभ भरावा लागतो.

नाहाटा कॉलेजजवळील जलकुंभाची क्षमता 20 लाख लिटर्स आहे. त्यातून दररोज 1 कोटी 50 हजार लिटर पाणीपुरवठा होतो. दररोज सातवेळा जलकुंभ भरावा लागत असल्याने स्वच्छतेची गरज नाही, असा जावईशोध पाणीपुरवठा विभागाने लावला.
क्लोरिनचा वापर जास्त
शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर पाण्यात असलेला क्लोरिन वायू पाणी घरात पोहोचेपर्यंत कायम असतो, यामुळे बॅक्टेरियाचा प्रभाव होत नाही. दररोज पाण्याचे वहन होत असल्याने जलकुंभ स्वच्छतेची गरज नाही.
ए.बी.चौधरी, अभियंता, पाणीपुरवठा विभाग