आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या उपक्रमात उदासीनता; ५२ मुख्याध्यापकांना नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवॉर्ड’ या उपक्रमात उदासीनता दाखवल्याप्रकरणी ५२ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे या नाेटीसा बाजवण्यात अाल्या अाहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, तसेच त्यांचा विज्ञानाशी जवळचा संबंध यावा, त्यांना नवनवीन यंत्र तसेच संशोधनपर साहित्य बनवण्यासाठी १९ ते २१ ऑगस्टदरम्यान व्ही. एस. जैन माध्यमिक विद्यालय (पारोळा) येथे जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ हा उपक्रम घेण्यात आला. परंतु या उपक्रमात विकत आणलेल्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत, असे दाखवून दिशाभूल करणे, अशा कारणांमुळे ५२ शाळा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

तालुकानिहाय शाळांचा सहभाग: जळगाव८, चाळीसगाव १८, जामनेर ७, एरंडोल १, धरणगाव १, चोपडा ३, भुसावळ १, अमळनेर २, रावेर २, पाचोरा २, यावल ६, भडगाव १.
बातम्या आणखी आहेत...