आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंशिस्त पाळा; अन्यथा कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांनी स्वयंशिस्त पाळून व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डी.एस.शनिगारे यांनी ‘दवि्य मराठी’ला सांगितले.

गेल्या आठवड्यात एका रिक्षाचालकाने दोन साथीदारांच्या मदतीने महिलेचा वनियभंग करीत पैसे व मोबाइल पळवला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘दवि्य मराठी’ने मुजोर रिक्षाचालकांच्या वागणुकीसंदर्भात वृत्त प्रसदि्ध केले होते. त्याची दखल घेत आता पोलिस प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी वाहतूक शाखेचे पोिलस निरीक्षक शनिगारे यांनी रिक्षाचालकांना दोन दवि संधी दिली आहे. त्यानंतर सोमवारपासून कारवाईचा धडाका लावला जाणार आहे. तसेच त्यांनी रिक्षाचालक आणि प्रवाशांना काही सूचनाही केल्या आहेत.
रिक्षाचालकांनी काय करावे?
- व्यवसाय करीत असलेल्या रिक्षाची सर्व कागदपत्रे जवळ ठेवावी.
- आपल्या परमिटवर दुसऱ्या चालकाला रिक्षा दिली असल्यास तो चालक निर्व्यसनी व प्रामाणिक असल्याची खात्री करून घ्यावी.
- रिक्षा चालवत असताना अंगात गणवेश व बॅच असणे बंधनकारक असून, त्यांचा वापर करावा.
- थांब्याशविाय रस्त्यांवर इतरत्र वाहने उभी करू नये. तसेच भररस्त्यात प्रवाशांची चढ-उतारही करू नये.
- रिक्षा थांब्यावर एका रांगेत रिक्षा उभ्या कराव्यात.
नागरिकांचीही जबाबदारी
- रिक्षाचालक मुजोर असल्यास त्याच्या रिक्षातून प्रवास करू नये.
- रिक्षा चालकाने अरेरावी केल्यास त्याच्या रिक्षाचा क्रमांक संबंधित पोलिस ठाण्याला कळवावा.
- मद्यपी किंवा अल्पवयीन चालक असल्यास प्रवास करू नये.