आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dishonest Leaders Cheated Narendra Modi, Aditya Thackeray Critise

अविश्वासार्ह नेते नरेंद्र मोदींची फसवणूक करताहेत, आदित्य ठाकरेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यामुळे २५ वर्ष जुनी युती तुटली. अजिबात विश्वासार्हता नसलेले हे नेते जनतेचीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील फसवणूक करीत आहेत, असा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी जळगावात केला.
खान्देश सेंन्ट्रल येथे आमदार सुरेश जैन यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
‘बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या व्यक्तींनी बांधलेली युती हा महाराष्ट्राच्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय होता. ही युती टिकली पाहीजे हेच आमचे ध्येय होते. म्हणून आम्ही प्रयत्न देखील केले. मात्र, राज्यातील भाजपची काही डोकी युती तोडण्यासाठी आतूर होती,’ असा आरोपही आदित्य यांनी नाव न घेता केला.

मी बोलण्यात गैर काय
माझ्या वयापेक्षाही युतीचे वय अधिक आहे. अनेक जणांच्या जिव्हाळ्याचा तो विषय आहे. युती टिकावी या उद्देशाने शिवसेनेच्या जेष्ठ पदाधिका-यांसोबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा करायला मी गेलो होते. त्यात २४ वर्षाच्या मुलाला बोलणी करायला पाठविले म्हणून भांडवल करण्याची गरज काय? १८ वर्षाचे युवक मतदान करून सरकार कोणाचे हे ठरवू शकतात, तर युती टिकली पाहीजे म्हणून २४ वर्षाचा मुलगा का बोलणी करू शकत नाहीत? असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना उद्देशून केला.

धडा शिकविणार | भाजपचे जेष्ठ म्हणवणारे नेते युती तोडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्या युती तोडणा-यांना आता धडा शिकवायचा आहे. त्यासाठी मी सकाळी तेथे (मुक्ताईनगरला) जावून आल्याचा टोलाही आदित्य यांनी खडसेंचे नाव न घेता लगावला.
भाजपवर प्रहार | मुख्यमंत्रीपदासाठी भाजपता सर्वाधिक भांडणे आहेत. हिंमत असेल तर भाजपचे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक लढवून पहावी, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच मोदींबाबत अजुनही आदर असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.