आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएममधून पैसे काढण्यावरून वाद; युवक-युवतीमध्ये हाणामारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्टेटबँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममधून दुसऱ्यांदा पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या युवतीला रांगेत उभ्या असलेल्या युवकाने हटकल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता वाद झाला. या वादातून युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली. तर युवकानेही युवतीला मारल्याने दोघांनाही पोलिसांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेले. तेथेही पाेलिसांदेखत युवतीने तिच्या नातेवाइकांनी युवकाला मारहाण केली. याप्रकरणी दाेघांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
रविवारी बँकांना सुटी असल्याने अनेक एटीएम शनिवारी रात्रीच रिकामे झाले हाेते. त्यामुळे साेमवारी सकाळपासूनच एटीएमवर गर्दी झाली होती. स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएमवरही सकाळपासूनच माेठी गर्दी हाेती. सकाळी १०.३० वाजता ममता स्वप्नील पाटील (वय २१, रा. वाघनगर) हिने एकवेळा एटीएमध्ये जाऊन अाल्यानंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी ती अात गेली. त्या वेळी रांगेत उभा असलेला सुनील भगवान पाटील (वय २३, रा. विठाेबानगर) याने तिला हटकले. लग्नाला जाण्यासाठी वेळ हाेत असल्याचे सांगून एकदाच पैसे काढण्यासाठी सांगितले. त्याचा राग अाल्याने तिने सुनीलशी वाद घालून त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सुनीलनेही तिला मारले.

काही वेळानंतर अाणखीन एक तरुणी अाली तिनेही सुनीलला पाेलिसांसमाेर मारहाण केली. तसेच पाेलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या रिक्षाचालकाने पाेलिसांशीही हुज्जत घातली.
हाणामारी करणाऱ्या युवक-युवतीचा जबाब घेताना पोलिस कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...