आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार भाेळे-माळींमध्ये वादाची ठिणगी, महानगर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महानगर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून अाला अाहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या वाढदिवसानिमित्त रिमांड हाेममध्ये अायाेजित कार्यक्रमात भाजपचे महानगराध्यक्ष तथा अामदार सुरेश भाेळे भाजपचे महापालिकेतील गटनेते सुनील माळी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कार्यक्रमाला उपस्थित खासदार ए. टी. पाटील, अामदार स्मिता वाघ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून पक्षांतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पक्षांतर्गत खदखद मात्र बाहेर काढण्यासाठी कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पाेहोचवण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खासदार ए.टी.पाटील, नाथ फाउंडेशन अाणि भाजपच्या क्रीडा अाघाडीतर्फे शहरात कार्यक्रम घेण्यात अाले. मॅरेथाॅन स्पर्धेचा कार्यक्रम अाटाेपल्यानंतर खासदार पाटील यांच्यातर्फे रिमांड हाेम येथील मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात अाले हाेते. या वेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित हाेते. या वेळी अामदार सुरेश भाेेळे यांनी हातात प्लेट घेऊन विद्यार्थ्यांना मिठाई वाटण्यास प्रारंभ केला. तेव्हा मनपाचे भाजपचे गटनेते सुनील माळी यांनी अामदारांच्या प्राेटाेकाॅलचा मुद्दा उपस्थित करत इतर सहकारी अामदारांना मदत करण्याच्या सूचना केल्या. हा धागा पकडून दाेन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. या वादाला पक्षांतर्गत वादाची पार्श्वभूमी असल्याने शाब्दिक तू-तू -मैं-मैं पुढे जात अरेरावीवर अाली. जुन्या वादालादेखील या वेळी फाेडणी देण्यात अाली. दरम्यान, खासदार ए. टी. पाटील, अामदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ अन्य पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करून दाेन्ही पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. पक्षांतील वाद असल्याने ताे येथेच मिटवण्याचा सल्लाही दिला.

पक्षांतर्गत प्रकरण
^रिमांडहाेम येथील कार्यक्रमात किरकाेळ विषयावरून अामचे बाेलणे झाले. अामदार म्हणून मी प्राेटाेकाॅल पाळावा, असा माळी यांचा अाग्रह हाेता. परंतु, तेथे अाम्ही सेवा करण्यासाठी गेलाे असल्याने प्राेटाेकाॅलचा संबंध येत नसल्याचे मी सांगितले. यात काेणतेही वाद नाहीत. हा अापसातील विषय अाहे. अामदार सुरेश भाेळे, महानगराध्यक्ष भाजप
बातम्या आणखी आहेत...