आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर भवनाजवळ रात्री तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भवानी पेठेतील सागर भवनाजवळील बोहरा मशिदीच्या पाठीमागे गटारीसाठी होणाऱ्या खोदकामावरून शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास वाद निर्माण झाला होता. गटारीची परवानगी नसताना अचानक कामाला सुरुवात झाल्याने तसेच रोहित्रा (डीपी) खालून होणाऱ्या कामाला नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे जेसीबीने सुरू असलेले काम अचानक बंद करण्यात आले होते.
आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून आरसीसी या गटारीचे काम मंजूर झाले आहे. त्याचे उद्घाटनही करण्यात आले. दिवसा वाहनांची गर्दी लक्षात घेता रात्री जेसीबीने खोदकामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र, खोदकामादरम्यान पाइपलाइन फुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मशिदीचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी एक गटार असताना दुसऱ्या गटारीच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी विरोध केला. चांगला रस्ता खराब होत असल्याचा मुद्दाही जमलेल्या नागरिकांनी मांडला. गटारीच्या कामाला मंजुरी असल्याने तसेच रात्री खोदकाम केल्यानंतर दिवसा महत्त्वाच्या कामाला वेळ मिळावा, म्हणून रात्रीच कामाला सुरुवात केल्याचे या वेळी सांगण्यात आले. नागरिकांचा विरोध लक्षात घेता जेसीबीने सुरू असलेले खोदकाम रात्री १० वाजता बंद करण्यात आले होते.