आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांशी हुज्जत पडली महागात, अभियांत्रिकीचा विद्यार्थी साेनसाखळी चाेरीत अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा पेठ परिसरातील पारीख पार्कजवळ शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता शहर वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करीत असताना दोन मद्यधुंद युवकांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांनी अाम्ही जबरी चाेरीतील गुन्हेगार असून पाेलिस अामचे काहीच बिघडवू शकत नाही, असा दमही भरला. त्यामुळे या दोन्ही तरुणांना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले. त्यातील एकाला रात्री १.३० वाजता साेनसाखळी चाेरीप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात अाली. ताे बांभाेरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

पारीख पार्क परिसरात शहर वाहतूक शाखेचे संताेष साेनवणे, पंडित वानखेडे, रमेश अहिरे, धनराज पाटील, सचिन निकम, याेगेश पवार, अजिज तडवी यांचे पथक वाहन चालकांवर कारवाई करीत हाेते. या वेळी बसस्थानकाकडून उदय (वय २३, रा. जुने जळगाव) आणि तुषार (वय २०, रा. संभाजीनगर, महाबळ) हे दाेघे माेटारसायकलवर (क्र. एमएच-१९-सीए-७७७३) जात हाेते. त्यांना वाहतूकपाेलिसांच्या पथकाने अडवले. या वेळी ते मद्यधंुद अवस्थेत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्या वेळी त्यांनी अाम्ही जबरी चाेरीतील गुन्हेगार अाहाेत. पाेलिस अामचे काहीच बिघडवू शकत नाही, असा दमही त्यांनी वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्यांना दिल्याचे जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांनी सांगितले.

सन२०१५मध्येही गुन्हा दाखल
संशयितउदय याच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालवण्याची कारवाई केली. तर तुषार याला साेनसाखळी चाेरीतील संशयित म्हणून अटक केली मे राेजी सकाळी ६.३० वाजता अाेंकार नगरातील सुनील मेडिकल समाेर कलावती मधुकर खडके (वय ६५) यांची साेनसाखळी चाेरी झाली हाेती. त्यात वापरलेली माेटारसायकल काळ्या रंगाची पल्सर असल्याचे त्यांनी सांगितले हाेते. त्या चाेरीतील संशयित म्हणून तुषार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दाेन संशयीत न्यायालयीन काेठडीत अाहेत. त्याच्यावर सन २०१५मध्ये रामानंदनगर पाेलिस ठाण्यात साेनसाखळी चाेरीचा गुन्हा झाला हाेता. मात्र, या वेळी ताे अल्पवयीन हाेता.

न्यायालयीन काेठडी
अाेंकारनगरातीलसाेनसाखळी चाेरीप्रकरणी तुषार याला जिल्हापेठ पाेलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी त्याला न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे. सरकारपक्षातर्फे अॅड. हेमंत मेेंडकी यांनी काज पाहिले.

चुकीच्या गुन्ह्यात अडकवले
पाेलिसांनी मुलाला चुकीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा अाराेप तुषारच्या कुटुंबीयांनी केला आहे. साेनसाखळी चाेरीतील फिर्यादीने चाेरी करणारा तुषार नसल्याचे सांगितल्यावरही पाेलिसांनी संशयित म्हणून त्याला अटक केली. त्यामुळे त्याचे भवितव्य खराब हाेईल, अशी भीती त्याच्या कुटुंबीयांनी या वेळी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...