आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेचा ताबा घेताना दाेन वकिलांना कानात लगावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्लाॅट परस्पर विक्री केल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर जागा ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या दाेन वकिलांची इतर चाैघांशी बाचाबाची झाली. यात समाेरील इतरांनी दाेघा वकिलांच्या कानशिलात लगावल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी परस्परविराेधी अदखलपात्र गुन्ह्याची रामानंदनगर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे.

गणपतीनगरातील प्लाॅट (क्रमांक २६) हा परस्पर विक्री केल्याचे कारण सांगून मार्च २०१३ राेजी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात सात जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. याप्रकरणी सामाईक मालकी हक्काचा खटला दाखल करण्यात अाला हाेता. त्या खटल्याचा निकाल लागल्याने जागा ताब्यात घेण्यासाठी शनिवारी सकाळी वाजेच्या सुमारास गेलेल्या सुरेश पांचाळ, तस्लिम अाणि दाेन महिला यांना अॅड.शाेभना सुभाष मुळे अाणि अॅड.साजीद देशमुख यांनी अडवले. त्यांच्यात बाचाबाची हाेऊन पांचाळ यांनी मुळे अाणि देशमुखांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी दाेघांनी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात शनिवारी परस्परवराेधी अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे.

असे अाहे प्रकरण
गणपती नगरातील प्लाॅट (क्रमांक २६) सिद्धार्थ शेखर रायसाेनी यांनी मूळ मालक विद्या मुळे यांच्याकडून ११ जुलै २०१२ रोजी विकत घेतला हाेता. या व्यवहारानंतर सुहासिनी सुभाष मुळे यांनी सामाईक मालकीचा मुद्दा उकरून काढला. याप्रकरणी त्यांनी विद्या मुळे, सिद्धार्थ रायसाेनी, शरद अमृतराव चव्हाण, नितीन चंद्रकांत लापसिया, वर्षा धनंजय शिंदे, पल्लवी मनाेहर चव्हाण, हर्षा अाेमप्रकाश उपाध्ये यांच्याविराेधात खाेटे दस्तएेवज तयार करून जमीन लाटल्याप्रकरणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला हाेता. यात मार्च २०१३ राेजी तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी के.अार.चाैधरी यांनी गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले हाेते. या प्रकरणाचा २६ अाॅक्टाेबरला मुख्य न्यायदंडाधिकारी एस.अार.शिंदे यांनी निकाल दिला. त्यात त्यांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचा तपास अहवाल, विद्या मुळे यांनी न्यायालयासमाेर सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत जागा सिद्धार्थ रायसाेनी यांची असल्याचा निकाल दिला आहे.

जागा ताब्यात घेण्यावरून वाद
जागा ताब्यात घेण्याच्या वादातून शनिवारी सकाळी ते ११ या दाेन तासांपर्यंत गणपतीनगरात गाेंधळ सुरू हाेता. दुकाने पाडण्यासाठी अालेल्या जेसीबीसमाेर मुळे देशमुख यांनी अाडवे येत, अतिक्रमण पाडण्यास मज्जाव केला. त्यामुळे बाचाबाची झाली गाेंधळ वाढतच गेला.

दुकान ताेडण्यापासून अडवले
न्यायालयाच्या निकालानंतर जागा ताब्यात घेण्यासाठी रायसाेनी यांच्यातर्फे सुरेश पांचाळ, तस्लिम अाणि दाेन महिला शनिवारी सकाळी वाजेच्या सुमारास गेल्या. त्या ठिकाणी अॅड.शाेभना मुळे अाणि अॅड.साजीद देशमुख यांनी त्यांना दुकान ताेडण्यापासून अडवले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात पांचाळ यांनी मुळे अाणि देशमुख यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अॅड.शाेभना मुळे यांनी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश पांचाळ, तस्लिम अाणि दाेन अज्ञात महिलांच्या विराेधात मारहाण केल्याची तक्रार दिली; तर सुरेश पांचाळ यांनी अॅड.शाेभना मुळे, सुहासिनी मुळे अाणि अॅड.देशमुख यांच्याविराेधात मारहाण केल्याची फिर्यादी दिली अाहे.