आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: पाचाेऱ्यातील बनावट नाेटांचा छापखाना उद‌्ध्वस्त; जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाचाेरा शहरातील जळगाव रस्त्यावर असलेल्या त्र्यंबकनगरात सुरू असलेला बनावट नाेटांचा छापखाना भडगाव पाेलिस ठाण्याचे पथक अाणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केला. याप्रकरणी पाेलिसांनी पाच जणांना अटक केली असून, बनावट नाेटा छापण्याचे साहित्य ताब्यात घेतले अाहे. 

भडगाव पाेलिस ठाण्याचे निरीक्षक डी. के. परदेशी यांना शहरात बनावट नाेटा चलनात अाल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून त्यांनी याेगेश पाटील, रवी पाटील, सचिन चाैधरी, लक्ष्मण पाटील यांना दाेन दिवसांपूर्वी तपासासाठी पाठविले हाेते. भडगाव शहरातील किरण साहेबराव पाटील हा बनावट नाेटा चलनात अाणत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यावरून पाेलिसांनी त्याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून ५० रुपयांच्या बनावट नाेटांचे बंडल मिळविले. त्यानुसार त्याला मंगळवारी रात्री वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून घरात असलेल्या सर्व ५० रुपयांच्या नाेटा ताब्यात घेतल्या. त्याची चाैकशी केली असता, नाेटा पाचाेरा येथे छापल्या असल्याची कबुली त्याने दिली.

६७ हजारांच्या बनावट नोटा
१००५० रूपयांच्या बनावट नोटा छापणे यशस्वी झाल्यानंतर हे भामटे अाता ५०० रुपयांच्या बनावट नाेटा छापण्याच्या तयारीत हाेते. त्यासाठी त्यांनी फाॅरमॅटही तयार केलेले हाेते. मात्र, त्यापूर्वीच हे भामटे पोलिसांच्या हाती लागले. यांंच्याकडून ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 

त्र्यंबक नगरात बनावट नाेटांचा छापखाना 
भडगावपाेलिसांचे पथक अाणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तरीत्या पाचाेरा येथील त्र्यंबकनगरात जाऊन पवन राजेंद्र चाैधरी याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातून प्रिंटर, स्कॅनर, बनावट नाेटा छापण्यासाठी लागणारे कागद, काॅम्प्युटर तसेच १००, ५० रुपयांच्या बनावट नाेटा जप्त केल्या. 

महिनाभरापासून सुरू हाेता धंदा 
भडगाव,पाचाेरा तालुक्यात या भामट्यांनी गेल्या महिन्यापासून बनावट नाेटांचा धंदा जाेरात सुरू केला हाेता. त्यात २० हजारांच्या बनावट नाेटांसाठी ते १० हजार रुपये घेत हाेते. त्यानंतर पाेलिसांनी या प्रकरणातील संशयित नानू कदम, दुर्याेधन बाबुराव खैरनार, विशाल पीतांबर साळवे यांना पाचाेऱ्यातील जनता वसाहतीमधून ताब्यात घेतले, तर सहावा संशयित सिद्धार्थ माेरे याचा रात्री उशिरापर्यंत शाेध सुरू हाेता. या सर्व संशयितांच्या घरांतून पाेलिसांनी बनावट नाेटा जप्त केल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...