आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्हा बँकेसाठी ९८.१४ टक्के मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मंगळवारी ९८.४१ टक्के मतदान झाले. दिग्गज उमेदवार सकाळी वाजेपासून मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी संपूर्ण जिल्हा मतदारसंघ असल्याने त्यांनी सर्व केंद्रांवर भेटी दिल्या. इतर संस्था मतदारसंघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी पुण्यातून येऊन मतदानाचा हक्क बजावला. महिला प्रवर्गातील उमेदवार रोहिणी खडसे यांनी बहुतांश तालुक्यांमध्ये जाऊन मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. यावल आणि चाळीसगाव येथे काही वेळ गोंधळ उडाला होता. प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी तसेच उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपापली यंत्रणा उभी केली होती. सकाळी वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. १० ते वाजेदरम्यान मतदान पूर्ण झाले होते. सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांनी सहलीवर रवाना केलेले मतदान एकाच वेळी आल्याने सोसायटी मतदार संघातील मतदान लवकर झाले. इतर संस्थांच्या मतदारांना विलंब लागला. बोदवडमध्ये दुपारी वाजता संपूर्ण १०० टक्के मतदान झाले होते.

यावलमध्ये धावपळ...
यावल मतदान केंद्रावर १२ मतदारांना मतपत्रिका कमी पडल्या. स्थानिक अधिकार्‍यांच्या नियोजनाअभावी मतपत्रिका कमी पडल्या. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे यांनी तत्काळ रावेर केंद्रावर विशेष सायरन असलेल्या गाडीची व्यवस्था करून तत्काळ मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी वाजून ५८ मिनिटांनी मतदान केंद्रावर मतपत्रिका पोहोचल्या.

अ‍ॅड. रवींद्र पाटलांचा ४० मतांचा विक्रम
बोदवड सोसायटी मतदार संघाचे उमेदवार असलेले अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी तब्बल ४० मते दिली. सोसायटी मतदारसंघात त्यांच्या नावे ठराव झाले होते. इतर संस्था मतदारसंघात त्यांच्या नावे ठराव झाले होते. एकूण वेळा त्यांनी ४० उमेदवारांना मत दिले. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत एकाच मतदाराने तब्बल वेळा ४० उमेदवारांना मतदान केले.
मतदानासाठी आलेल्या गुलाबराव देवकर यांनी आमदार साेनवणे सहकार्‍यांशी चर्चा केली.

तालुका निहाय मतदान
अमळनेर-९८.६६, भडगाव- ९९.२८, भुसावळ- ९७.२८, बाेदवड- १००, चाळीसगाव- ९८.९२, चोपडा- ९४.७१, धरणगाव- १००, एरंडोल- ९९.११, मुक्ताईनगर- ९७.३३, जामनेर- ९९.५५, पाचोरा- ९६.६९, पारोळा- ९९.०२, रावेर-९६.९४, यावल- ९९.६६, जळगाव- ९८.४५ एकूण जिल्हा- ९८.४१

संचालकांच्या १५ जागांसाठी ४६ उमेदवारांची प्रतिष्ठापणाला
धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी ९६.५४ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान शहरातील बाफना हायस्कूलमधील किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. गुरुवारी (िद.७) तांत्रिक िवद्यालयात मतमोजणी होणार आहे. गेल्या पंधरा वर्षांनंतर भाजपने विशेष रस घेतल्याने धुळे नंदुरबार जिल्हा बँकेची निवडणूक झाली. मोठ्या अवधीनंतर होत असलेल्या निवडणुकीमुळे लक्ष लागून आहे.