जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ संचालकांच्या निवडीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ते सायंकाळी वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल.
विकास सोसायटी मतदारसंघातील जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांसाठी आणि
राखीव प्रवर्गातील अशा एकूण १५ जागांसाठी मतदान होईल. २,८५६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवारी मतदान होऊन गुरुवारी मतमोजणी होणार आहे. मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटवणे आवश्यक असणार आहे.
धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या ठिकाणी १८ मतदान केंद्रांवर सकाळी ते या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी या उद्देशाने प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बळसाणे यांनी दिली.
यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेतकरी सहकार पॅनल तर भाजपकडून शेतकरी पॅनलद्वारे ही निवडणूक लढवण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या एकूण १७ जागांपैकी दोन जागांवर संचालकांची बिनविरोध निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी एकूण १८ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी शंभरपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती केली गेली आहे. त्यांना सोमवारी मतपत्रिका आणि इतर निवडणूक साहित्याचे वाटप तांत्रिक विद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी गौतम बळसाणे यांच्याकडून निवडणूक पारदर्शक होण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आल्या. त्यादृष्टीने प्रत्येक केंद्रावर एका व्हिडिओ फोटोग्राफरची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच ज्या तालुक्याच्या मतदार यादीत नाव असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रातच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
ही आहेत मतदान केंद्रे
धुळेशहर (तीन केंद्र) वनिता समाज शाळा, रोटरी मार्ग. साक्री तालुका (दोन केंद्र) -न्यू इंग्लिश स्कूल, साक्री. शिरपूर तालुका (दोन केंद्र)- पां. बा. माळी म्युनिसिपल हायस्कूल. शिंदखेडा तालुका (तीन केंद्र)- जिल्हा परिषद शाळा क्र. ५, नंदुरबार शहर (दोन केंद्र)- नगरपालिका शाळा क्र.१ नंदुरबार. शहादा तालुका (दोन केंद्र)- नगरपालिका शाळा क्र.१६ नंदुरबार. नवापूर तालुका (एक केंद्र)- जि.प.मराठी मुलींची शाळा. तळोदा तालुका (एक केंद्र)- जि.प.शाळा नं. तळोदा. अक्कलकुवा तालुका (एक केंद्र)-जि.प.कन्या शाळा अक्कलकुवा. अक्राणीमहल (एक केंद्र)- फक्त राखीव जागेसाठी- सातपुडा सर्वोदय मंडळाचे कै. पी. पी. पराडके विद्यालय धडगाव असे एकूण दहा तालुक्यांत १८ केंद्रांची व्यवस्था मतदानासाठी करण्यात आली आहे.