आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक निवडणूक: सुनावणीपूर्वी प्रांतांनी अर्जदारांचे म्हणणे मागवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘क’ वर्ग सोसायट्यांमधील अर्ज अवैध ठरवल्याप्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली स्थगिती उठवली अाहे. विभागीय सहनिबंधकांकडे अपील करणाऱ्या २० जणांच्या अर्जावर साेमवारी सुनावणी हाेणार अाहे. त्यापूर्वी प्रांताधिकारी अभिजित भांडे यांच्याकडे सर्वांचेच म्हणणे एेकून घेण्यात येणार अाहे. अर्जदारांची भूमिका स्पष्ट झाल्यावर तातडीने हा अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे पाठवला जाणार अाहे.

सहकारमंत्र्यांच्या स्थगिती उठवण्याच्या निर्णयामुळे ‘क’ वर्ग साेसायट्यांमधून बँकेत येण्याच्या तयारीत असलेल्यांची निराशा झाली अाहे. मात्र, शेवटचा अाशेचा किरण म्हणून विभागीय सहनिबंधकांकडे हाेणाऱ्या सुनावणीकडे अर्जदारांचे लक्ष लागून अाहे. दरम्यान, धुळ्याप्रमाणेच जळगाव जिल्हा बँकेतही संधी द्यावी, या मागणीसाठी २० जणांनी सहनिबंधकांकडे अपील केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...