आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Election: With Gurdian Minister MLAs Also File Nomination Form

जिल्हा बँक निवडणूक: पालकमंत्र्यांसह अामदारांचेही अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: उमेदवारी अर्ज दाखल करताना संजय पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ.
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री एकनाथ खडसे, अामदार डाॅ.सतीश पाटील, अामदार किशाेर पाटील, अामदार चंद्रकांत साेनवणे, अामदार सुरेश भाेळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बहुतांश इच्छुकांनी मंगळवारचा मुहूर्त निश्चित केला अाहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी इच्छुकांनी साेमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्याकडे अर्ज दाखल केले. विविध कार्यकारी साेसायटी मतदारसंघ अाणि राखीव जागांसाठी इच्छुकांमध्ये माेठी स्पर्धा निर्माण हाेण्याची शक्यता अाहे.

दुसऱ्या दिवशी अडीचशे अर्ज
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी २४१ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले हाेते. साेमवारी दुसऱ्या दिवशी २५४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. त्यापैकी साेमवारी ३७ उमेदवारांनी ५९ उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक दिग्गजांनी अद्यापही अर्ज दाखल केलेले नाहीत. मंगळवार बुधवार हे दाेन दिवस उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

विमुक्त जाती, भटक्या जमाती राखीव :विजय पाटील (जळगाव), मंगेश पाटील (भडगाव), मेहताबसिंग नाईक (भडगाव)

इतर मागासवर्गीय राखीव : अामदारडाॅ.सतीश पाटील (पाराेळा), दिगंबर पाटील (जामनेर), बाळासाहेब पाटील (पाराेळा), दत्रात्रय पवार (भडगाव)

इतर संस्था मतदारसंघ :इंदिरा पाटील (भडगाव), अमाेल शिंदे (पाचाेरा), प्रदीप पाटील (जळगाव)
महिला राखीव : इंदिराबाईपाटील (चाेपडा), मंगला पाटील(अमळनेर), लीलाबाई पाटील (चाळीसगाव), शाेभना पवार(भडगाव), महानंदा पाटील (एरंडाेल).

अनुसूचितजाती, जमाती राखीव : अामदारचंद्रकांत साेनवणे(जळगाव), रामचंद्र जाधव (चाळीसगाव)
विविध कार्यकारी साेसायटी : एकनाथखडसे (मुक्ताईनगर), संजय पवार (धरणगाव), अॅड.रवींद्र पाटील (बाेदवड), नानासाहेब देशमुख (भडगाव), राजीव पाटील (रावेर), पांडुरंग सराफ (यावल), धनश्याम पाटील, इंदिरा पाटील (चाेपडा), संजय गरुड, नाना पाटील, प्रदीप लाेढा (जामनेर), अामदार किशाेर पाटील, सीताराम पाटील, सतीश शिंदे (पाचाेरा), चिमणराव पाटील, बाळासाहेब पाटील (पाराेळा), प्रवीण पाटील, सुरेश पाटील, मंगलाबाई पाटील, (अमळनेर), अामदार सुरेश भाेळे, दुर्गादास भाेळे, रमेश ढाके (जळगाव)