आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: Khadse, Ravindra Patil To Be Elected

जिल्हा बँक निवडणूक: खडसे, रवींद्र पाटील बिनविराेधची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगरमधून पालकमंत्री एकनाथ खडसे, बाेदवडमधून अॅड.रवींद्र पाटील धरणगावमधून संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वपक्षीय पॅनलच्या सकारात्मक चर्चेतून पहिल्याच टप्प्यात या तिन्ही जागा बिनविराेध हाेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अाहे. दरम्यान, इतर जागा बिनविराेध हाेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राखीव जागांवर राजकीय पक्षांमध्ये एकमत हाेत नसल्याची स्थिती अाहे.

साेमवारी अामदार डाॅ.सतीश पाटील, अामदार चंद्रकांत साेनवणे, अामदार किशाेर पाटील, अामदार सुरेश भाेळे, बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्यासह ३७ जणांनी अर्ज दाखल केले. मुक्ताईनगर, बाेदवड अाणि धरणगाव येथील जागा बिनविराेध हाेण्याचे संकेत मिळाले अाहेत. विकास साेसायटी मतदारसंघातून ठरावांची स्थिती मजबूत असल्याने मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे, बाेदवडमधून अॅड.रवींद्र पाटील अाणि धरणगावमधून संजय पवार यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज साेमवारी दाखल झाले. तसेच भडगावमधून विद्यमान संचालक नानासाहेब देशमुख पाराेळ्यातून बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. अामदार सुरेश भाेळे यांनी जळगावमधून, अामदार किशाेर पाटील यांनी पाचाेऱ्यातून, अामदार डाॅ.सतीश पाटील यांनी अाेबीसी राखीव प्रवर्गातून, तर अामदार चंद्रकांत साेनवणे यांनी अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रवर्गातून अर्ज दाखल केला.

सर्वपक्षीय पॅनलसाठी मुक्ताईनगर, बाेदवड अाणि धरणगाव येथील जागा बिनविराेध हाेणार असून, इतर तालुक्यांमध्येही त्याकरिता प्रयत्न सुरू अाहेत. मात्र, राजकीय बंडाेबांची मनस्थिती लक्षात घेऊन इतर ठिकाणी वेळ द्यावा लागणार अाहे. चाळीसगाव, चाेपडा, यावल, जामनेर, रावेर भडगाव या मतदारसंघांत राजकीय तडजाेड हाेण्याची शक्यता अाहे. अमळनेर, पाराेळा, एरंडाेल, जळगाव, पाचाेरा अाणि भुसावळमधील राजकीय लढत टाळण्यासाठी समितीला विशेष प्रयत्न करावे लागणार अाहेत.

मतदारसंघात स्थिती नाजूक असलेल्या दिग्गजांची अाेबीसी राखीव मतदारसंघ अाणि इतर संस्थांमधून स्पर्धा वाढण्याची शक्यता अाहे. राखीव जागांमध्ये महिला राखीवसाठी शिवसेना अाणि भाजपने मागणी केली अाहे. अाेबीसी राष्ट्रवादीकडे, विमुक्त जाती भाजपकडे अनुसूचित जाती-जमाती शिवसेनेकडे जाण्याची शक्यता अाहे. इतर संस्था मतदारसंघांतून मात्र राष्ट्रवादीला संधी मिळण्याची शक्यता अाहे. दरम्यान, विकास साेसायटी मतदारसंघातील स्थिती पाहता राखीव जागांमध्ये कांॅग्रेसला संधी देण्यासंदर्भात इतर पक्ष अनुकूल नसल्याची स्थिती अाहे.