जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धरणगाव विकास साेसायटी मतदारसंघातून संजय मुरलीधर पवार हे बिनविराेध निवडून अाले अाहेत. मुक्ताईनगरमधून पालकमंत्री एकनाथ खडसे, जामनेरमधून जलसंपदामंत्री गिरीश महाजन अाणि अॅड.रवींद्र पाटील यांच्याविराेधात देखील बाेदवडमधून अाव्हाने उभे केले अाहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १७५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वपक्षीय उमेदवार म्हणून धरणगावमधून संजय पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बिनविराेधची शक्यता असलेल्या पालकमंत्री खडसे अाणि रवींद्र पाटील यांच्याविराेधात शेवटच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धरणगाव मतदारसंघातून संजय पवार यांची बिनविराेध निवड हाेणार असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले हाेते. हे वृत्त तंताेतंत खरे ठरले. मुक्ताईनगर अाणि बाेदवड येथे शेवटच्या दिवशी राजकीय समीकरणे बदलल्याने अर्ज दाखल झाले अाहेत; परंतु माघारीच्या मुदतीनंतर या मतदारसंघांचे चित्र स्पष्ट हाेईल.
पवारांचे सर्वपक्षीय राजकारण
गेल्यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विकास साेसायटी मतदारसंघातून साेनल संजय पवार यांची बिनविराेध निवड झाली हाेती. गेल्या अाठवड्यात झालेल्या जिल्हा कृषी अाैद्याेगिक संस्थेच्या निवडणुकीतदेखील त्या बिनविराेध निवडून अाल्या. या वेळी धरणगाव विकास मतदारसंघात संजय पवार यांची बिनविराेध निवड झाली अाहे. पवार यांचे वडील मुरलीधर पवार यांची देखील १९८७ मध्ये विधान परिषदेवर बिनविराेध निवड झाली हाेती. जिल्हा बँकेवर सलग दुसऱ्यांदा तर जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये सलग तिसऱ्यांदा विराेधात एकही अर्ज दाखल हाेता बिनविराेध निवड हाेण्याचा विक्रम पवार कुटुंबीयांनी केला अाहे.