जळगाव - सर्व पक्षीय पॅनलनिर्मितीमध्ये एरंडाेल तालुका मतदारसंघातील उमेदवार निवडीसंदर्भात सर्वपक्षीय समितीमध्ये रस्सीखेच सुुरू आहे. या जागेसंदर्भात समितीमध्ये एकमत हाेण्याची शक्यता नसल्याने निर्णय पालकमंत्र्यांवर साेपवला जाण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय पॅनलमध्ये एरंडाेलमधून विद्यमान संचालक माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांना संधी द्यावी, म्हणून आमदार डाॅ.सतीश पाटील हे आग्रही आहेत; तर हाच मतदारसंघ शिवसेनेसाठी साेडावा, अशी भूमिका सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष तथा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्याकडून मांडण्यात आली आहे.
तालुक्यातील ठरावांची संख्या लक्षात घेऊन जागा काेणाला साेडावी यासंदर्भात सर्वपक्षीय समितीने अहवाल सादर केला असला तरी, अनेक जागांवर चित्र स्पष्ट झालेले नाही. एरंडाेल मतदारसंघातून महेंद्रसिंग पाटील यांचा पॅनलमध्ये घेण्यासंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही आहे, तर या तालुक्यात आमची स्थिती चांगली असल्याचे सांगत माजी आमदार चिमणराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला साेडण्याची मागणी केली आहे. एरंडाेल मतदारसंघातून अमाेल चिमणराव पाटील यांनी उमेदवारीचीतयारीकेली आहे. मंगळवारी महेंद्रसिंग पाटील, दिलीप राेकडे या दाेघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेे. विद्यमान संचालक असल्याने ही जागा महेंद्रसिंग पाटील यांच्यासाठी साेडण्यात यावी, अशी मागणी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ.सतीश पाटील यांनी केली आहे. शिवसेनेने जागेची मागणी केली असली तरी उमेदवार काेण असेल, हे मात्र स्पष्ट केले नसल्याची चर्चा आहे.
दिग्गजांचे अर्ज दाखल
मंगळवारीजलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, माजी खासदार अॅड.वसंतराव माेरे, माजी आमदार गुलाबराव देवकर, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटील, अरुण पाटील, उपमहापाैर सुनील महाजन, संजय पवार, वाडिलाल राठाेड, तिलाेत्तमा पाटील, अरुणा पाटील यांनी अर्ज दाखल केले. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
...तर गिरीश महाजन घेतील माघार
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पुन्हा एक उमेदवारी अर्ज दाखल केला. बँकेचे विद्यमान संचालक डिगंबर पाटील हे विकास साेसायटी मतदारसंघातून बाद झाले आहेत, तर दुसरीकडे खासदार ईश्वरलाल जैन यांनीसुद्धा महाजनांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला जाईल. संजय गरुड, प्रदीप लाेढा या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेऊन बिनविराेधचा मार्ग माेकळा केल्यास महाजन हेदेखील माघार घेतील. लढत झाल्यास मात्र गरुड यांच्याविराेधात महाजनांची उमेदवारी राहणार असल्याचे समीकरण आहे.