आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: Shiv Sena Candidates In Nationalist Congress

जिल्हा बँक निवडणूक: सेनेच्या उमेदवार राष्ट्रवादीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रवादी प्रणित लाेकमान्य शेतकरी पॅनलमधील महिला राखीव प्रवर्गातील एका जागेवर शिवसेनेच्या महानंदा पाटील यांचा समावेश करण्यात अाला अाहे. मंगला पाटील यांना डावलून बुधवारी महानंदा पाटील यांचा पॅनलमध्ये समावेश करण्यात अाला. पॅनलमध्ये प्रवेशाचा सिग्नल मिळताच महानंदा पाटील ह्या इतर उमेदवारांसाेबत तातडीने प्रचाराला लागल्या. राष्ट्रवादीच्या पॅनलमधून तिलाेत्तमा पाटील बाहेर पडल्याने रिक्त पॅनलमधील एक जागा रिक्त झाली हाेती. या जागेवर संधी मिळावी म्हणून मंगला पाटील प्रयत्नशील हाेत्या. दरम्यान, राष्ट्रवादीने ही जागा रिक्त ठेवून पॅनलची घाेषणा केली हाेती. बुधवारी या जागेवर राष्ट्रवादीच्या मंगला पाटील यांच्याएेवजी शिवसेनेच्या महानंदा पाटील यांना संधी देण्यात अाली.

राष्ट्रवादीने तयार केलेल्या पॅनलमध्ये केवळ एकच महिला अाहे. या पॅनलचा प्रचार करताना नेते एक मत राष्ट्रवादीसाठी तर दुसरे मत राेहिणी खडसे यांच्यासाठी मागत अाहेत. पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षात असल्याने राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये मला घेणे अावश्यक हाेते. मात्र, मागणी करूनही प्रवेश दिला जात नसून उलट भाजपच्या महिलेसाठी मते मागितली जात असल्याचा अाराेप राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तथा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार मंगला पाटील यांनी केला अाहे. पक्षाच्या पॅनलमध्ये स्थान मिळवणे हा अापला अधिकार असून त्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजेपासून पक्ष कार्यालयासमाेर उपाेषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मंगला पाटील म्हणाल्या, पक्षात सर्वत्र कार्यकर्त्यांची नेत्यांकडून मुस्कटदाबी हाेत अाहे. बँकेत पुढे असलेले हेच चेहरे उद्या दूध संघाच्या निवडणुकीत दिसतील. कार्यकर्त्यांना कुणीच वाली नसल्याने मनमानी करणा-या नेत्यांविरुद्ध अावाज उठवण्याची गरज अाहे.

पॅनल वा-यावर
सर्वपक्षीयपॅनलविराेधात जाऊन पॅनल तयार केलेल्या नेत्यांनी पक्षाचे पॅनल वा-यावर साेडल्याची स्थिती अाहे. पॅनलनिर्मितीसाठी पुढे अालेल्या खासदार ईश्वरलाल जैन अाणि अामदार डाॅ.सतीश पाटील हे अापापल्या दिनचर्येत व्यस्त असल्याने राष्ट्रवादीचे पॅनल वा-यावर साेडले अाहे. तसेच पॅनलचे साेसायटी मतदारसंघातील उमेदवार स्थानिक पातळीवर वैयक्तिक प्रचार करीत अाहेत; तर राखीव जागांवरील उमेदवार एकत्र येऊन तालुकानिहाय प्रचार करीत अाहेत. दरम्यान, प्रचारात त्या-त्या तालुक्यातील नेत्याशिवाय इतर काेणीही साेबत येत नसल्याची स्थिती अाहे. खासदार जैन हे दिल्लीत अाहेत, तर अामदार डाॅ.पाटील हे मविप्र संस्थेच्या निवडणुकीत व्यस्त अाहेत. अरुण गुजराथी अाणि अॅड.वसंतराव माेरे हे माघारीच्या दिवसानंतर पुन्हा अज्ञातवासात गेले अाहेत.

चुकलेल्या नेत्यांचे काय?
कार्यकर्तेचुकले तर नेते लागलीच कारवाई करतात, येथे नेतेच चुकले अाहेत. बँकेत त्यांनी यापूर्वीदेखील इतिहास घडवला अाहे. त्यांच्या चुकीवर काेण कारवाई करणार? कार्यकर्त्यांनीच नेत्यांना वठणीस अाणले पाहिजे. माझ्या भूमिकेसंदर्भात शरद पवार, अजित पवार अाणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही फॅक्स करून माहिती दिली आहे.