आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Give Loan For Farm Compound, Solar Pump

जिल्हा बँकेकडून शेती कुंपण, साैरपंपास कर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँक २७ मे २०१६ राेजी १००व्या वर्षात पदार्पण करणार अाहे. बँक शंभरी पूर्ण करताना वर्षभर विविध कार्यक्रम, शिबिरांचे अायाेजन केले जाणार अाहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध मान्यवरांना यानिमित्त निमंत्रित केले जाणार असल्याबाबत शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात अाली. दरम्यान, बँक यापुढे शेतीसाठी कुंपण अाणि ग्रीन हाऊस, पाॅली हाऊस निर्मितीसाठी कर्जपुरवठा करणार अाहे. लवकरच साैरपंप याेजनेसाठीही अर्थसाहाय्य करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात अाली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक शुक्रवारी अायाेजित करण्यात अाली हाेती. पालकमंत्री एकनाथ खडसे बैठकीला उपस्थित हाेते. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान हाेत असल्याने शेतीला कुंपण करण्यासाठी कर्ज द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी हाेती. त्यात बँकेच्या संचालक मंडळाने शुक्रवारी कुंपणाला कर्ज देण्याचा विषय मंजूर केला. राज्य शासन अाणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यात करार हाेऊन लवकरच शेतकरी साैरपंप याेजना सुरू केली जाणार अाहे. यात शासन ५० टक्के अनुदान अाणि जिल्हा बँक शेतकऱ्यांना ५० टक्के कर्ज उपलब्ध करून देणार अाहे. ग्रीन हाऊस, पाॅली हाऊससाठीदेखील शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्ज दिले जाणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अॅड.राेहिणी खडसे -खेवलकर यांनी दिली.

वर्षभर विविध कार्यक्रम
बँकेच्या१००व्या वर्षातील पदार्पणानिमित्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी याेजना, विदेश अभ्यासदाैरे अादी कार्यक्रम अायाेजित केले जाणार अाहेत. सहकार क्षेत्रात माेठी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करून कार्यक्रम अायाेजित केले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात अाली. बैठकीला १४ संचालक उपस्थित हाेते. या बैठकीत एकूण १८ विषयांवर निर्णय घेण्यात अाले.

कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न
जे.टी. महाजन सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, गिरणी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला नाही. चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार अाहे. वसंत साखर कारखाना भाडेतत्त्वाने देणे किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतला जाणार अाहे. कारखाने सुरू करून राेजगारनिर्मिती करण्यास प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. मधुकर सहकारी साखर कारखान्याला बँकेने ६० काेटी रुपये मंजूर केले. त्यासाठी अातापर्यंत त्यांना २६ काेटी रुपये उपलब्ध करून दिले अाहेत.