आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा 1 कोटी भरा, ४० महिन्यांत कर्जमुक्त व्हा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात यापूर्वीच एकरकमी कर्ज परतफेड याेजनेचा लाभ दिला अाहे. त्यामुळे अाता मनपास कर्ज खात्यावरील येणे बाकी त्यावरील १३ टक्क्याप्रमाणे हाेणाऱ्या व्याजाचा दरमहा कोटी भरणा करून ४० महिन्यांत कर्ज खाते निरंक करता येईल, असा सल्ला बँकेने दिला अाहे.
हुडकाेसाेबत जिल्हा बँकेच्या कर्जफेडीचा विचार पालिका प्रशासन करू लागले अाहे. त्यादृष्टीने पालिकेने जिल्हा बँकेसाेबत पत्रव्यवहारदेखील सुरू केला अाहे. पालिकेने जिल्हा बँकेकडून सुमारे ६९ काेटी रुपये कर्ज घेतले हाेते. त्यापाेटी १०० काेटींपेक्षा जास्त भरणा केला अाहेे. एकरकमी कर्जफेडीसंदर्भात जिल्हा बँकेने पालिकेला अत्यंत स्पष्ट उत्तर दिले अाहे. बँक थकबाकीदार संस्था अथवा सभासदांसाठी नाबार्ड, शासन, राज्य सहकारी बँक यांनी घालून दिलेले निकष तत्त्वानुसार एकरकमी कर्ज परतफेड याेजना राबवत असते. या याेजनेची मुदत संपली असून अंतिम तारीख ३० जून २०१६पर्यंत हाेती असेही पत्रात म्हटले अाहे.

महापालिकेला यापूर्वीच लाभ
महापालिकेने१० फेब्रुवारी २०१०च्या पत्राने दीर्घ मुदत कर्जाचे रिसेटिंग रिशेड्युलिंग करून मिळण्याबाबत प्रस्ताव बँकेकडे सादर केला हाेता. त्यात बँकेने मनपाला कर्ज उचल तारखेपासून म्हणजे एप्रिल २००१ पासून १३ टक्के सरळ व्याज पद्धतीने अाकारणी करून जानेवारी २००९ पासून कर्जाचे रिसेटिंग तथा रिशेड्युलिंग करून दिले अाहे. या रिसेटिंग रिशेड्युलिंग करून देताना मनपास एकरकमी कर्ज परतफेड याेजनेचा लाभ देण्यात अाला अाहे. त्यामुळे अाता मनपास कर्ज खात्यावरील येणे बाकी त्यावरील १३ टक्के व्याजाचा संपूर्ण भरणा करून कर्ज खाते निरंक करता येईल, असे म्हटले अाहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला अाता डिसेंबर २०१९पर्यंत प्रतिमहिना एक काेटींचा भरणा करणे हा एकमेव पर्याय उरला असून त्यादृष्टीने विचार करीत अाहे.

काय अाहे तत्त्व
एकर कमीकर्ज परतफेडीचे प्रमुख तत्त्व म्हणजे संस्था अथवा सभासद यांच्याकडून कर्ज उचल तारखेपासून १३ टक्के व्याजदराने अाकारणी करून हाेणाऱ्या व्याजापेक्षा संस्थांनी केलेला व्याजाचा भरणा जास्त असल्यास मुद्देमालाची संपूर्ण रक्कम घेऊन कर्जखाते निरंक केले जाते. या पर्यायाच्या दृष्टीने विचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...